३० एप्रिलपर्यंत शनिवार, रविवार वनपर्यटन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:45+5:302021-04-11T04:07:45+5:30

नागपूर : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांतर्गत वनपर्यटनावर काही निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ...

Forest tourism closed on Saturday and Sunday till April 30 | ३० एप्रिलपर्यंत शनिवार, रविवार वनपर्यटन बंद

३० एप्रिलपर्यंत शनिवार, रविवार वनपर्यटन बंद

नागपूर : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांतर्गत वनपर्यटनावर काही निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत दर शनिवार आणि रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य येथील वनपर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेंच प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ठिकाणच्या पर्यटन नियमासाठी नागपूर आणि वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना वन विभागाने सूचना दिल्या आहेत.

या काळात आगाऊ आरक्षण केलेल्या पर्यटकांना रक्कम परत दिली जाणार आहे. हे दोन दिवस वगळून अन्य दिवसासाठी सकाळच्या फेरीच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. सकाळी ६ ते १० ऐवजी सकाळी ७ ते ११ अशी वेळ करण्यात आली आहे. जिप्सीमध्ये यापूर्वी सहा पर्यटकांना परवानगी होती. मात्र यापुढे प्रौढ तीन पर्यटकांनाच एका वाहनातून जाता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना ही अट मान्य नसल्यास आरक्षण रद्द करता येणार आहे.

...

टिपेश्वर अभयारण्य बंद

टिपेश्वर अभयारण्य पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यामुळे पुढील काळासाठी येथील पर्यटन बंदच राहणार आहे. दोन दिवसापूर्वीच यासंदर्भात आदेश निघाले आहेत.

...

Web Title: Forest tourism closed on Saturday and Sunday till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.