शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र धोरणात राष्ट्रहिताशी तडजोड नाही : सुषमा स्वराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:19 IST

हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देराष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या शिल्पाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भेटीगाठी व पार्ट्यात ये-जा करण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता भाजपाच्या काळात परराष्ट्र धोरण राबविताना राष्ट्रहिताशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केले. 

राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या चाळिसाव्या स्मृतिप्रीत्यर्थ रामनगर येथील श्रीशक्तिपीठ येथे नूतनीकृत शिल्पाच्या लोकार्पणप्रसंगी सुषमा स्वराज बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का,कार्यवाहिका स्मिता केळकर व अध्यक्षा डॉ. गरिमा सप्रे आदी उपस्थित होत्या. 
युनोतील १९१ देशांपैकी अनेक देशांचे आपसात पटत नाही. अमेरिका-रशिया, सौदी अरब-इराण यांच्यात वाद आहेत. परंतु भारताने जागतिक संबंधांच्या संतुलनाचे प्रयोग केले; म्हणूनच आपसात पटत नसलेल्या अनेक देशांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत. परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक केली जाते. चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून विदेशात नेले जाते. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळत नाही. त्यांना विदेशातून परतही येता येत नाही. एनडीए सरकारच्या काळात अशी फसवणूक झालेल्या २ लाख २ हजार ६६६ लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली. 
मावशी केळकर यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न होते. त्यानुसार पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’,पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, महिला सक्षमीकरणाच्या योजना हाती घेतल्या आहेत. महिला सशक्त झाली तर देश सशक्त होईल. या हेतूने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी लघु व मध्यम उद्योगांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध केली जाते. यात तीन टक्के महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेला माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुलींचा जन्मदर वाढल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी यावेळी केला. 
शांतक्का म्हणाल्या, मावशी केळकर यांच्या प्रेरणेतून श्रीशक्तिपीठाचे कार्य सुरू आहे. शिल्पाच्या माध्यमातून यापुढेही प्रेरणा मिळणार आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कार्य यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन मेघा नांदेकर यांनी केले. यावेळी श्रीशक्तिपीठाच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजnagpurनागपूर