शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करतो सांगून तरुणीवर केली जबरदस्ती; तिच्या भावाला पाठविला व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 21:21 IST

Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत संबंध प्रस्थापित केले. ते करताना काढला व्हिडिओ आणि नंतर तरुणीने नकार दिल्यावर हा व्हिडिओ तिच्या भावाला पाठवून तिला धमकावल्याची घटना नागपुरात घडली.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात राहणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गावातील आरोपीने तिच्यावर दोन वर्षात वारंवार बलात्कार केला. ती विरोध करीत असल्याने तिच्या भावाच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाठवून तिला आणि कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला.

चंद्रकुमार लिंबाजी कापगते (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो कुरखेडा तालुक्यातील रहिवासी आहे.

तक्रार करणारी तरुणी नागपुरातील सक्करदऱ्यात एका खासगी इस्पितळात कर्मचारी आहे. तीन वर्षांपूर्वी आरोपी कापगते तिच्या गावात राहायला गेला होता. त्यामुळे त्याच्यासोबत तिची ओळख होती. २०१९ मध्ये तो एकदा तिच्याकडे नागपुरात आला. ‘तू मला खूप आवडते, तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे म्हणून त्याने तिला सीताबर्डी येथील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी मोबाईलमध्ये शरीरसंबंधाची क्लिप तयार केली. त्यानंतर तो तिच्याकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करू लागला.

त्याचे लग्न आधीच झाले आहे, अशी माहिती मिळाल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत बातचीत बंद केली. ती टाळत असल्याचे पाहून आरोपी कापगते तिला शरीरसंबंधाची अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. अलीकडे तिने त्याला जोरदार विरोध केल्यामुळे काही दिवसापूर्वी आरोपीने तरुणीच्या भावाच्या मोबाईलवर ही अश्लील क्लिप पाठविली. हिच्यासोबत माझे संबंध असल्याचे त्याला सांगितले. भावाने तिला यासंबंधाने जाब विचारला. त्यामुळे तरुणीने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी झिरो क्राईमी करून प्रकरण बुधवारी रात्री सीताबर्डी ठाण्यात पाठविले. ठाणेदार अतुल सबनीस यांनी आरोपी कापगतेविरुद्ध बलात्कार करून ब्लॅकमेल करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी