शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ऑटोमोबाईल क्षेत्रातील गुंतवणूक, महिंद्रा गुंतवणार १५ हजार कोटी

By योगेश पांडे | Updated: February 6, 2026 19:21 IST

नेक्स जेन कारची निर्मिती नागपुरात : १० हजार लोकांना रोजगार मिळेल, मुख्यमंत्र्यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विदर्भासाठी मोठ्या गुंतवणूकीचा सामंजस्य करार झाला. महिंद्रा ॲंड महिंद्रा कंपनीने विदर्भात १५ हजार कोटी गुंतवणूक करण्याबाबत करार केला आहे. कंपनीकडून नागपुरात नेक्ट जेन व अत्याधुनिक एसयूव्हीची फॅक्टरी टाकणार आहे. ही इन्टिग्रेटेड फॅक्टरी असेल व त्यात ईव्ही कार, नेक्स्ट जेन कार व ट्रॅक्टर्स तयार होतील. यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कार्यक्रमानंतर शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवात एकूण चार सामंजस्य करार करण्यात आले. त्यातील महिंद्रा ॲंड महिंद्रासोबत झालेला करार महत्वाचा आहे. पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील गुंतवणूक विदर्भात आली आहे. महिंद्रा ॲंड महिंद्रा नेक्ट जेन व अत्याधुनिक एसयूव्हीची फॅक्टरी टाकणार आहे. ही महिंद्राची सर्वात मोठी फॅक्टरी असेल. छत्रपती संभाजीनगर व नाशिकमध्येदेखील ते गुंतवणूक करत आहेत. आम्ही त्यांना सोळाशे एकर जागा त्यांना देणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

२०२८ पासून उत्पादनाला सुरुवात

ही गुंतवणूक आगामी दहा वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने होणार असून, २०२८ पासून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १५० एकर क्षेत्रावर सप्लायर पार्क उभारण्यात येणार असून, पुढील टप्प्यात त्याचा विस्तार इगतपुरी येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर करण्यात येणार आहे.

अजित पवारांच्या मृत्यूनंतरचे राजकारण खालच्या पातळीचे

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर जो काही वाद होतो आहे तो निरर्थक व चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती यात स्वत:चे राजकारण पाहण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री व मोठे नेते होते. त्यांच्यानंतर होणारे राजकारण चुकीचे असून खालच्या पातळीचे हे राजकारण बंद झाले पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahindra Invests ₹15,000 Crore in Vidarbha's First Automobile Sector Venture

Web Summary : Mahindra & Mahindra invests ₹15,000 crore in Vidarbha, Maharashtra, establishing a next-gen SUV factory in Nagpur. This integrated facility will produce EVs, next-gen cars, and tractors, creating 10,000 jobs. Production is expected to begin in 2028. A supplier park will be established in Chhatrapati Sambhajinagar and Igatpuri.
टॅग्स :Vidarbhaविदर्भAutomobileवाहनnagpurनागपूरMahindraमहिंद्रा