शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

गरजूंना अन्नदानासाठी नागपूर मनपामध्ये फूड झोन; पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंना अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 8:51 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपा मुख्यालयामध्ये फूड झोन तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनपाच्या महिला कर्मचारी करताहेत भोजन पॅकिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपाच्या या कार्यात आतापर्यंत ५० स्वयंसेवी संस्थांनीही सहकार्य दिले आहे. शुक्रवारी (ता.१०) मनपा मुख्यालयामध्ये फूड झोन तयार करण्यात आले आहे. या फूड झोनमध्ये मनपाच्या कर विभागाच्या महिला कर्मचारी जेवण पॅकिंगचे काम करीत आहेत तर पुरूष कर्मचा-यांमार्फत हे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविले जात आहे. शुक्रवारी (ता.१०) पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्यात आले आहे.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात मनपातर्फे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील बेघर, निराधार व्यक्तींची भोजन व्यवस्था केली जात आहे. या कायार्साठी प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या नेतृत्त्वात मनपाची संपूर्ण चमू कार्यरत आहे.मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दुस-या माळ्यावर मनपातर्फे फूड झोन तयार करण्यात आले आहे. मनपाच्या स्थानिक संस्था कर आणि मालमत्ता कर विभागाचे ८० कर्मचारी बेघर, निराधार, गरजूंना जेवण मिळावे यासाठी कार्य करीत आहेत. सर्व कर्मचारी टप्प्याटप्प्याने सोशन डिस्टसिंगचे पालन करीत सेवाकार्य करीत आहेत. या कायार्साठी दोन स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत. लॉकडाउन दरम्यान कुणीही उपाशी राहू नये याकरिता स्वामी नारायण मंदिर संस्थेतर्फे मनपाला पोळ्यांची तर रतन पॅलेस गणेशपेठ सोसायटी या संस्थेतर्फे भाजीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. दोन्ही संस्थांकडून दररोज येणारे जेवण मनपाच्या फूड झोनमध्ये स्थानिक संस्था कर व मालमत्ता कर विभागाच्या महिला कर्मचा-यांकडून पॅक केले जाते. पॅक झालेले जेवणाचे डबे दोन्ही विभागाचे पुरूष कर्मचारी गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. शुक्रवारी (ता.१०) पहिल्याच दिवशी सर्व कर्मचा-यांतर्फे एक हजार जेवणाचे डबे तयार करण्यात आले व ते गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.गरजूंनी मनपाशी संपर्क साधानिराधार, बेघर व ज्यांच्याकडे जेवणाची सुविधा नाही अशा व्यक्तींकरीता मनपाद्वारे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होउ शकत नाही, अशा गरजू व्यक्तींनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका