वाहतूक नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:27+5:302021-01-03T04:11:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : मानवी चूक करून रस्ते अपघाताला कारणीभूत ठरू नका आणि कुठल्याही निष्पाप व्यक्तीचा जीव घेऊ ...

Follow traffic rules | वाहतूक नियमांचे पालन करा

वाहतूक नियमांचे पालन करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : मानवी चूक करून रस्ते अपघाताला कारणीभूत ठरू नका आणि कुठल्याही निष्पाप व्यक्तीचा जीव घेऊ नका. कारण कुणी तरी त्याची आणि आपली घरी वाट बघत असते. अपघातमुक्त जीवन जगण्यासाठी वाहतूक नियम पाळणे, ही आपली जीवनशैली बनवा, असे आवाहन ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी केले.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कळमेश्वर पाेलिसांनी वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती माेहीम राबविली. वाहनचालकांना गुलाबपुष्प देत नशापाणी करून रस्ते अपघाताला कारणीभूत पडू नका अथवा बळी पडू नका, नववर्षाचे स्वागत कुटुंबीयांसाेबत करा आणि आम्ही वाहतूक नियमांचे काटेकाेरपणे पालन करू, असा नवीन वर्षात संकल्प करा, असे आवाहनही पाेलिसांनी केले. यावेळी रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य राजू वाघ, अपघातमुक्त भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमन बाेरे, जीवन सुरक्षा प्रकल्पाचे प्रदेश सचिव डाॅ. राज दिवाण, १०८ चे विभागीय व्यवस्थापक डाॅ. प्रशांत घटे, पाेलीस हवालदार शंकर पाल, आदी उपस्थित हाेते. शुभम अहिरकर, राेहित कुरळकर, खुशाल मंडलिक, दिनेश वरवळे, निखिल लामसे, आदित्य तरार, चेतन घुमडे, मल्हार बाेरे, तनीश तेलेवार, स्वाती काेल्हे, श्वेता हनवटे, आदींनी सहकार्य केले.

Web Title: Follow traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.