लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला चायनीज पदार्थांची ओळख करून देणारे सर्वात जुने रेस्टॉरंट ‘नानकिंग’चे संचालक राजनगर येथील रहिवासी फॉग्गीग शिन येन चांग यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते यकृताच्या आजाराने पीडित होते. एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्यांचे निधन झाले.नागपुरात चौकाचौकातच नव्हे तर गल्लीबोळात चायनीज पदार्थ तयार करणाºयांची संख्या वाढली आहे. चायनीज पदार्थाची आवड असणाºयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र, नागपुरात ४९ वर्षांपासून चायनीज पदार्थाची मूळ चव आणणारे फॉग्गीग शिन येन चांग हे कुटुंब राहिले आहे. फॉग्गीग यांची आई चांग मोय चेन या १९६८ मध्ये भारतात आल्या. याच दरम्यान त्यांचे नागपुरात येणे झाले. हे शहर त्यांना एवढे आवडले की त्या येथेच स्थायिक झाल्या. सदर भागातातील रेसीडेन्सी रोडवर आपले चायनीज पदार्थांचे रेस्टॉरंट उघडले. यात त्यांचा मोठा मुलाग फॉग्गीग मदत करायचा. फॉग्गीग यांनी हे रेस्टॉरंट वाढविण्यास परिश्रम घेतले. फॉग्गीग यांनी मांसाहारासोबतच बेबी कॉर्न, मशरुम आणि मंचुरियन पदार्थांची आवड असणाºयांना विदेशी चायनीज पदार्थांची ओळख करून दिली. याची चव त्यांचे लहान भाऊ यांनी कॅनडापर्यंत पोहोचविली. तेथे त्यांचे भाऊ चायनीज रेस्टॉरंट चालवितात. फॉग्गीग यांच्यानंतर ही परंपरा नागपुरात त्यांचा मुलगा साइरस शिन येन चांग पुढे नेत आहे.
चायनीज चव आणणारे फॉग्गीग यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:45 IST
शहराला चायनीज पदार्थांची ओळख करून देणारे सर्वात जुने रेस्टॉरंट ‘नानकिंग’चे संचालक राजनगर येथील रहिवासी फॉग्गीग शिन येन चांग यांचे निधन झाले.
चायनीज चव आणणारे फॉग्गीग यांचे निधन
ठळक मुद्देशिन येन चांग यांचे ४९ वर्षांपासून नागपुरात वास्तव्य : चायनीज पदार्थांची चव पोहचली कॅनडापर्यंत