शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यावर भर

By admin | Updated: January 12, 2015 00:58 IST

जात वैधता प्रमाणपत्र अर्जदारांना लवकर मिळावे यासाठी पडताळणी समित्यांची संख्या वाढविण्यासोबतच इतरही काही पर्यायांवर शासन पातळीवर विचार करणे सुरू आहे. विशेषत:

नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र अर्जदारांना लवकर मिळावे यासाठी पडताळणी समित्यांची संख्या वाढविण्यासोबतच इतरही काही पर्यायांवर शासन पातळीवर विचार करणे सुरू आहे. विशेषत: प्रक्रियेतील जाचक अटींवर काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली . यासंदर्भात काही जिल्ह्यातून सूचनाही शासनाला करण्यात आल्या आहेत.शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ प्राप्त करण्यासाठी मागासवर्गीयांना जात प्रमामपत्र व त्याची पडताळणी करून घ्यावी लागते. जात पडताळणी प्रक्रिया ही अलीकडच्या काळात अर्जदारांसाठी फारच डोकेदुखी ठरली असून त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न गत आघाडी सरकारने आणि आताच्या नवीन सरकारनेही हाती घेतले आहेत. मात्र अद्याप तरी त्याचा थेट लाभ अर्जदारांना झाला नाही.गत आघाडी सरकारने पडताळणी समित्यांची संख्या वाढविली होती.मात्र त्यासाठी अधिकारीच दिले नाहीत. त्यामुळे वाढीव समित्यांचा काहीही उपयोग झाला नाही. आता जिल्हा पातळीवर या समित्या स्थापन करण्याचे आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सामाजिक न्याय खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांनी सभागृहात आणि बाहेरही दिले आहेत. यासोबतच जात वैधता प्रमाणपत्र देताना सध्या अस्तित्वात असलेल्या काही नियमांमध्ये बदल करण्याची सूचना काही जिल्ह्यातून करण्यात आल्या आहे. ज्या अर्जाबाबत किंवा कागदपत्रांबाबत शंका नसेल किमान त्यांना तरी तत्काळ प्रमाणपत्र मिळावे आणि केवळ असलेल्या अर्जाची नियमानुसार चौकशी करावी, असा एक विचार पुढे आला आहे. अनेक वेळा अर्जदार मागासवर्गीय आहे हे स्पष्ट असतानाही केवळ त्याच्या आजोबाच्या काळातील कागदपत्र नसल्याने संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. याच कारणामळे अनेक मागासवर्गीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाही वंचित राहावे लागते. सध्या मागासवर्गीयांना १९५० च्या पूर्वीचे कागदपत्रांची मागणी केली जाते. त्याऐवजी १९६० पासूनची कागदपत्रे मागितली तर ती मिळू शकेल. कारण तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली असल्याने कागदपत्रे संग्रहित असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)