अबब ! नागपुरात फुलला उत्सव तब्बल २५ हजार फुलझाडांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 10:57 IST2017-12-04T10:54:05+5:302017-12-04T10:57:16+5:30
अशाच निरनिराळ्या सुंदर फुलांचे आकर्षक प्रदर्शन हिस्लॉप महाविद्यालयात सुरू आहे. देशभरातील १०० पेक्षा जास्त प्रकारच्या २५ हजार फुलझाडांनी महाविद्यालयाचा परिसर प्रदर्शनासाठी सजविण्यात आला आहे.

अबब ! नागपुरात फुलला उत्सव तब्बल २५ हजार फुलझाडांचा
आॅनलाईन लोकमत
नागपूर:
वसंत हा जसा पानगळीनंतर झाडांना नवी पालवी येण्याचा ऋतू तसाच शरद हा फुलांच्या बहरण्याचा ऋतू. थंडीची चाहूल लागली की उमललेल्या कळ्यांची फुले होतात. निसर्गाचा हा अनोखा नजराणा कुणाला आवडणार नाही. अशाच निरनिराळ्या सुंदर फुलांचे आकर्षक प्रदर्शन हिस्लॉप महाविद्यालयात सुरू आहे. देशभरातील १०० पेक्षा जास्त प्रकारच्या २५ हजार फुलझाडांनी महाविद्यालयाचा परिसर प्रदर्शनासाठी सजविण्यात आला आहे. गुलाब, शेवंती, जाई, सिलोशिया, डाईअॅन्थस, मेरीगोल्ड, जिनीया, पिटूनिया, झेंडू, मोगरा अशा ओळखीच्या फुलांसह अनेक नवीन प्रकारची फुलेही इथे आहेत. नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देत असून विविध रोपेही आवडीने खरेदी करत आहेत.