उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 14:22 IST2019-12-28T14:21:48+5:302019-12-28T14:22:33+5:30
काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त नगर काँग्रेस मुख्यालयात नागपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त नगर काँग्रेस मुख्यालयात नागपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवनपासून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भारत बचाव, संविधान बचावच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगर काँग्रेसचे पदाधिकारी, सेवादल, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व विद्यार्थी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.