नागपुरातील महामेट्रो जोमात, यशाची पाच वर्षे पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 01:00 AM2020-02-18T01:00:27+5:302020-02-18T01:01:27+5:30

एखादा प्रकल्प अधिकाधिक गतीने कसा पूर्ण होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नागपूरची मेट्रो रेल्वे प्रकल्प होय.

Five years of achievement of Mahametro, Nagpur | नागपुरातील महामेट्रो जोमात, यशाची पाच वर्षे पूर्ण 

नागपुरातील महामेट्रो जोमात, यशाची पाच वर्षे पूर्ण 

Next
ठळक मुद्देप्रत्यक्ष प्रवासी सेवेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखादा प्रकल्प अधिकाधिक गतीने कसा पूर्ण होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नागपूरचीमेट्रो रेल्वे प्रकल्प होय. २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन व २०१५ पासून नागपूर शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माणकार्याला सुरुवात झाली. २०१५ ते २०२० हा पाच वर्षाचा प्रवास महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाचे अनेक शिखर गाठणारे ठरले. या वर्षात नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दोन मार्गिका ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन झाले आणि प्रत्यक्षात प्रवासी सेवाही सुरू झाली.
सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर मार्गिकेवर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे कार्य जलदगतीने होण्यास मदत झाली. नागपूर मेट्रो आता खऱ्या अर्थाने नागपूरकरांची माझी मेट्रो बनली आहे.

पाच वर्षातील घडामोडीवर एक नजर

  • १८ फेब्रुवारी २०१५ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची स्थापना
  • ३१ मे २०१६ नागपूर मेट्रोच्या कामाला सुरुवात
  • २३ जानेवारी २०१७ नागपूर मेट्रोचे महामेट्रोमध्ये रूपांतर
  • २ ऑगस्ट २०१७ पहिल्या ३ मेट्रो कोच शहरात दाखल
  • ३० सप्टेंबर २०१७ ट्रायल रनला सुरुवात
  • २२ नोव्हेंबर २०१८ चीन येथील सीआरआरसी डालियन प्लांट येथून मेट्रो ट्रेन रवाना
  • ७ मार्च २०१९ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रो ऑरेंज लाईन (खापरी से सीताबर्डी इंटरचेंज)चे लोकार्पण
  • ८ मार्च २०१९ खापरी ते सीताबर्डी इंटरचेंजदरम्यान आभार राईडचे आयोजन
  • ३१ मे २०१९ अ‍ॅक्वा लाईनच्या लोकमान्यनगर ते सुभाषनगरदरम्यान पहिली ट्रायल रन
  • १५ ऑगस्ट २०१९ महामेट्रो येथे सुभाषनगर से सीताबर्डी इंटरचेंजदरम्यान पहिल्यांदा ट्रायल रन
  • २७ नोव्हेंबर २०१९ खापरी ते सीताबर्डीदरम्यान १५ मिनिटात ८० कि.मी. गतीने प्रवासी सेवा सुरू
  • २८ जानेवारी २०२० अ‍ॅक्वा लाईन सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मार्गाचे उद्घाटन

Web Title: Five years of achievement of Mahametro, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.