दरवर्षी तयार होणार पाच हजार पिनाक रॉकेट

By Admin | Updated: February 12, 2015 02:11 IST2015-02-12T02:11:53+5:302015-02-12T02:11:53+5:30

भारतीय सैन्य दलाची मुख्य ताकद असलेल्या पिनाक रॉकेटचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.

Five thousand Pinak rockets to be prepared every year | दरवर्षी तयार होणार पाच हजार पिनाक रॉकेट

दरवर्षी तयार होणार पाच हजार पिनाक रॉकेट

नागपूर : भारतीय सैन्य दलाची मुख्य ताकद असलेल्या पिनाक रॉकेटचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे नागपुरातील अंबाझरी आयुध निर्माणीची उत्पादन क्षमता वाढणार असून, अंबाझरी आयुध निर्माणीतून आता दरवर्षी पाच हजार पिनाक रॉकेट तयार होतील.
अंबाझरी आयुध निर्माणी येथे पिनाक रॉकेट तयार केले जाते. पिनाक मल्टी बॅरेल रॉकेट भारतीय सैन्य दलासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या रॉकेटचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. उत्पादन क्षमता वाढणार असल्याने त्यासाठी अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये या प्रकल्पासाठी अतिरिक्त बांधकाम करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी प्रदान केली आहे. या बांधकामाचे व इतर प्रशासकीय कामाचे भूमिपूजन आयुध निर्माणी अंबाझरीचे जनरल मॅनेजर सौरभ कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी आयुध निर्माणी अंबाझरी येथे पार पडले.(प्रतिनिधी)

Web Title: Five thousand Pinak rockets to be prepared every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.