नागपूर शहर पोलीस दलातील आणखी पाच पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:08 IST2020-08-08T01:06:58+5:302020-08-08T01:08:43+5:30
शहर पोलीस दलातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी उघड झाले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर शहर पोलीस दलातील आणखी पाच पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस दलातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी उघड झाले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यापासून पोलिस दल अक्षरश: हादरले आहे. त्यामुळे आतापर्यंत काहीसे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी आता स्वत:ची चाचणी करून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलातील तीन कर्मचारी तसेच त्यांचे दोन नातेवाईक यांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. विशेष म्हणजे, सर्दी, ताप, खोकला याचा त्रास असणारे शहर पोलीस दलातील एकूण २८८ अधिकारी-कर्मचारी उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीवर आम्ही सूक्ष्म नजर ठेवून आहोत, अशी माहिती पोलिस इस्पितळाचे डॉ. संदीप शिंदे यांनी दिली आहे.