सारीचे आणखी पाच नवे रुग्ण मेडिकलमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:16 IST2020-05-12T23:14:30+5:302020-05-12T23:16:20+5:30
‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ११ मे रोजी यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये आज आणखी पाच नवे रुग्ण दाखल झाले.

सारीचे आणखी पाच नवे रुग्ण मेडिकलमध्ये दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ११ मे रोजी यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये आज आणखी पाच नवे रुग्ण दाखल झाले. सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मेडिकलमध्ये ७ मे रोजी पांढराबोडी, शताब्दीनगर व मोमिनपुऱ्यातील तीन सारीचे रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर ९ मे रोजी जवारहरनगर येथील ५१ वर्षीय पुरुष व पार्वतीनगरमधील २४ वर्षीय पुरुष रुग्णाची भर पडली. यातील पांढराबोडी येथील २९ वर्षीय सारी व कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला इतरही आजार असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु सारीचे रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. आज मेडिकलमध्ये सारीचे पाच रुग्ण भरती झाले. यात मोमिनपुरा येथील ३९ वर्षीय महिला, दिघोरी येथील ५० वर्षीय पुरुष, पार्वतीनगर येथील ३२ वर्षीय पुरुष, जुनी शुक्रवारी हनुमानगर येथील ५९ वर्षीय पुरुष व चंदननगर येथील ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये सारीच्या वॉर्डात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सारीचे रुग्ण नव्या वसाहतींमधून येत असल्याने त्या-त्या वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे.