शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नागपुरात आणखी पाच चिमुकल्यांचे श्रवणदोष दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 10:33 PM

घरात आधीच दारिद्र्य त्यात चार वर्षाची रेणुका जन्मत: कर्णबधिर. रेणुकाचे वडील बांधकाम मजूर. आठ लाख रुपये खर्च करून महागडा उपचार करणे अशक्य. त्यामुळे मुलीला उपचार द्यावे तरी कसे या चिंतेने, या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले होते. परंतु शासनाच्या योजनेचा फायदा मिळवून देत मेयोच्या ईएनटी विभागाने पुढाकार घेत रेणुकावर शनिवारी यशस्वी शस्त्रक्रिया करून कॉकलिअर इम्प्लांटच्या माध्यमातून तिला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देमेयोच्या ईएनटी विभागाचा पुढाकार : आतापर्यंत १३ मुलांवर कॉकलिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात आधीच दारिद्र्य त्यात चार वर्षाची रेणुका जन्मत: कर्णबधिर. रेणुकाचे वडील बांधकाम मजूर. आठ लाख रुपये खर्च करून महागडा उपचार करणे अशक्य. त्यामुळे मुलीला उपचार द्यावे तरी कसे या चिंतेने, या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले होते. परंतु शासनाच्या योजनेचा फायदा मिळवून देत मेयोच्या ईएनटी विभागाने पुढाकार घेत रेणुकावर शनिवारी यशस्वी शस्त्रक्रिया करून कॉकलिअर इम्प्लांटच्या माध्यमातून तिला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली.विशेष म्हणजे, प्रसिद्ध ईएनटी सर्जन पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने, मेयोच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी व डॉ. विपीन इखार यांनी रेणुकासह पाच चिमुकल्यांवर तर आतापर्यंत १३ मुलांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पर्याय ठरत आहे. नागपूरसह विदर्भ आणि मध्य प्रदेशातील रेणुका रवींद्र शिंदेसह फिजा अन्सारी, मोहमंद अवेज शेख,शाहिद अन्सारी, ध्रृव भूरे, सोहन चिकलदर, रितिका जंगहरे, सिद्धी जाधव, सुमित पटले, नक्षत्रा तलमले, क्रिती सरकार, शीतल सोनकुसरे या चिमुकल्यांवर मेयोत कॉकलिअर इम्प्लांट करून त्यांना नवे जीवन देण्यात आले.‘एडीआयपी’मुळे रुग्णांना फायदाडॉ. वेदी म्हणाले, भारतात लहानपणीच इतर चाचण्यांबरोबरच श्रवण क्षमतेची चाचणी करून घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. परिणामी, उपचार असूनही अनेकांना आयुष्यभर मूकबधिर अवस्थेत जीवन जगावे लागते. श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पर्याय ठरत आहे. मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागात ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ सेंटर सुरू झाल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. या इम्प्लांटमुळे शब्द आणि त्याची संरचना त्या मुलाच्या मेंदूपर्यंत थेट जाते. शब्द समजण्यास व बोलण्यास मदत होते. इम्प्लांटसाठी बाळाचा एक ते पाच वर्षापर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. ‘इम्प्लांट’ नंतर तीन वर्षे ‘स्पीच थेरपी’ द्यावी लागते. त्यानंतर रुग्णाला चांगले बोलता येते. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात या सर्वाला सात ते दहा लाखांचा खर्च येतो. परंतु केंद्र सरकारच्या ‘स्कीम आॅफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’मुळे (एडीआयपी) रुग्णाला एक रुपयांचा खर्च येत नाही. परंतु ही योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Healthआरोग्य