आज नागपुरातून पाच विमानांचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 02:06 IST2020-06-18T01:48:39+5:302020-06-18T02:06:32+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे.

Five flights take off from Nagpur today | आज नागपुरातून पाच विमानांचे उड्डाण

आज नागपुरातून पाच विमानांचे उड्डाण

ठळक मुद्देचार इंडिगो व एअर इंडियाचे एक विमान

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंडिगोचे ६ई-२९७ नागपूर-मुंबई विमान सकाळी ११.३० वाजता उड्डाण भरणार असून, मुंबईला दुपारी १ वाजता पोहोचेल. याशिवाय ६ई-६१०४ नागपूर-पुणे सकाळी ११.५५ वाजता रवाना होऊन दुपारी १.०५ वाजता पोहोचेल, एअर इंडियाचे एआय- ४७० नागपूर-दिल्ली विमान सकाळी ९.४५ वाजता रवाना होऊन सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. याशिवाय इंडिगोचे ६ई-१३४ नागपूर-दिल्ली विमान दुपारी ४ वाजता रवाना होऊन ५.४५ वाजता दिल्लीला जाईल, तर ६ई-४०३ नागपूर-कोलकाता विमान रात्री ८.०५ वाजता निघून ९.५५ वाजता कोलकाताला पोहोचणार आहे.
याशिवाय परतीच्या प्रवासात ६ई-५३२५ मुंबई-नागपूर विमान सकाळी ९.१५ वाजता निघून १०.४० वाजता नागपुरात, ६ई-६२७९ पुणे-नागपूर विमान दुपारी २ वाजता रवाना होऊन नागपुरात ३.१५ वाजता येईल. तसेच एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर एआय-४६९ विमान सकाळी ६.३० वाजता उड्डाण भरून ८.१० वाजता नागपुरात, ६ई-१३५ दिल्ली-नागपूर सकाळी १० वाजता दिल्लीहून निघून नागपुरात ११.०५ वाजता आणि ६ई-४०४ कोलकाता-नागपूर विमान कोलकाताहून सायंकाळी ५.३५ वाजता निघून नागपुरात ७.२५ वाजता पोहोचणार आहे.

Web Title: Five flights take off from Nagpur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.