शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

 नागपुरात लस घेऊनही पाच डॉक्टर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 11:43 AM

Nagpur News कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. या आठ दिवसाच्या कालावधीत मेयो, मेडिकल व डेंटलमधील डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचारी मिळून ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे४२ डॉक्टर, परिचारिका व विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. या आठ दिवसाच्या कालावधीत मेयो, मेडिकल व डेंटलमधील डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचारी मिळून ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोज घेतल्यानंतरही पाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल) २ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू झाले आहेत. यातील १५ टक्के विद्यार्थी बाहेरील राज्यातील आहेत. फिजिकल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा विशेष वापर कमी झाल्याने मेडिकलमधील एमबीबीएसचे १५, डेंटलचे ५ तर मेयोचे २ असे एकूण २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. शिवाय, मेडिकलचा १ तर डेंटलचे ३ इन्टर्न, मेडिकलचे ८ व मेयोचे २ निवासी डॉक्टर, ४ परिचारिका व ३ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांना रुग्णालयातच क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोज घेऊनही पाच निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

- सहा विद्यार्थ्यांना होम आयसोलेशन

मेडिकलच्या सहा विद्यार्थ्यांकडून संमतीपत्र घेऊन त्यांना होम आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर तिन्ही रुग्णालय प्रशासन नजर ठेवून आहेत. परंतु विद्यार्थी, डॉक्टर व परिचारिकांमध्ये पुन्हा संसर्ग वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस