क्वाईन बॉक्सवरून मागितले पाच कोटी

By Admin | Updated: January 14, 2015 00:45 IST2015-01-14T00:45:37+5:302015-01-14T00:45:37+5:30

सायकलने आलेला मुलगा क्वाईन बॉक्सवरून पाच कोटींची मागणी करीत असल्याचे पाहून ‘शॉक’ झालो होतो, अशी साक्ष जरीपटका येथील मोबाईल रिचार्ज शॉपीच्या एका मालकाने आज युग चांडक

Five crores of demand from the Quinn box | क्वाईन बॉक्सवरून मागितले पाच कोटी

क्वाईन बॉक्सवरून मागितले पाच कोटी

न्यायालय : मोबाईल रिचार्ज शॉपी मालकाची साक्ष
नागपूर : सायकलने आलेला मुलगा क्वाईन बॉक्सवरून पाच कोटींची मागणी करीत असल्याचे पाहून ‘शॉक’ झालो होतो, अशी साक्ष जरीपटका येथील मोबाईल रिचार्ज शॉपीच्या एका मालकाने आज युग चांडक अपहरण-खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात दिली.
मोहनलाल बालानी, असे या साक्षीदाराचे नाव आहे.
आपली सरतपासणी साक्ष देताना बालानी यांनी सांगितले की, १ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एक मुलगा माझ्या दुकानात सायकलने आला होता. फोन करायचा आहे, असे तो म्हणाला होता. त्याने दहा रुपयाची नोट देऊन १० ‘क्वाईन घेतले होते. ‘पाच करोड लेकर आ’, असे तो फोन करणाऱ्याला म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मी ‘शॉक’ झालो. सायकलने आलेला मुलगा पाच कोटी रुपये मागत असल्याचे ऐकून आश्चर्य वाटले आणि त्याचेकडे नजर गेली. त्याच वेळी त्याने फोन बंद केला आणि तो निघून गेला. तो २२-२३ वर्षांचा मुलगा होता. दुसऱ्या दिवशी घरी पोलीस आले. त्यांनी ११ वाजता पोलीस ठाण्यात बोलावले.
३० आॅक्टोबर रोजी ओळखपरेडसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात बोलावण्यात आले. एका रांगेत सात जण होते. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकावर उभ्या असलेल्या मुलाला मी ओळखले. त्यानेच माझ्या दुकानात येऊन क्वाईन बॉक्सवरून पाच कोटीची मागणी केली होती. त्याने आपले नाव अरविंद सिंग, असे सांगितले होते.
या साक्षीदाराने न्यायालयात आरोपीच्या बाकावर बसून असलेल्या आरोपी अरविंद सिंग याला ओळखले.
होय, त्याने युगला थापड मारली होती
युग हा क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट टेबलवर ठेवलेल्या कॉम्प्युटवर गेम खेळायचा. ही बाब राजेश दवारे याला आवडत नव्हती. एक दिवस युग गेम खेळत बसला असता त्याने स्प्रिंगची खुर्ची खाली-वर केली होती. त्यामुळे राजेशने त्याला थापड मारली होती, अशी साक्ष डॉ. चांडक यांच्या क्लिनिकचा व्यवस्थापक प्रणय डोंगरे याने दिली. सरतपासणीत प्रणयने असेही सांगितले की, पेशंटकडून जास्त पैसे घेतल्याने राजेशला कामावरून काढून टाकण्यात आले होते. १ सप्टेंबर रोजी राजेशने फोन करून ‘मॅडम’बाबत विचारणा केली होती, असेही प्रणयने साक्षीत सांगितले.
याच क्लिनिकमधील अन्य एक कर्मचारी पंकज खुरपडे याने आपल्या साक्षीत अरविंद नाव सांगणाऱ्या व्यक्तीने १ सप्टेंबर रोजी डॉ. चांडक यांचा मोबाईल क्रमांक मागितला होता, असे सांगितले.
न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत.
युगच्या अपहरणाचा कट रचल्याचा नकार
डॉ. मुकेश चांडक राहत असलेल्या गुरुवंदना सोसायटी लकडगंज येथील इमारतीत बिहारलाल छाबडिया राहतात. त्यांचे इतवारी मस्कासाथ येथे किराणा दुकान आहे. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आपण जेवण करण्यास अ‍ॅक्टिव्हाने घरी आलो असता पार्किंगमध्ये आपल्या स्कोडा कारच्या मागे जांभळ्या रंगाची स्कूटी होती. तीवर लाल रंगाचा टी शर्ट घातलेला मुलगा होता. आपल्याला पाहून त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. या साक्षीदाराने घटनेच्या वेळी लाल रंगाच्या टी शर्टमध्ये असलेल्या अरविंद सिंगला न्यायालयात ओळखले. बचाव पक्षाच्या वकिलांकडून छाबडिया यांची उलटतपासणी घेण्यात आली. सुनील गौर, प्रलय डोंगरे, संदीप कटरे, महेंद्र पौनीकर यांची आपली ओळख आहे, या प्रश्नाला उत्तर देताना छाबडिया यांनी नकार दिला. तुम्ही युग चांडक याच्या अपहरण केसमधून वाचविण्यासाठी खोटी साक्ष देत आहात, याही प्रश्नावर त्यांनी नकार दिला. अपहरणाचा कट आपणच रचला होता, याही प्रश्नाला त्यांनी नकार दिला.

Web Title: Five crores of demand from the Quinn box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.