शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

नागपूरनजिकच्या जुनेवानीत पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:06 PM

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर जुनेवानी गावात बुधवारी (दि. १) पहिल्यांदा एसटी महामंडळाची बस पोहोचली.

ठळक मुद्देग्रामस्थांचा जल्लोषचालक-वाहकाचे स्वागत

आॅनलाईन लोकमतकाटोल : स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर जुनेवानी गावात बुधवारी (दि. १) पहिल्यांदा एसटी महामंडळाची बस पोहोचली. अतिदुर्गम भाग म्हणून तालुक्यात ओळख असलेल्या जुनेवानी येथील नागरिकांची प्रलंबित मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली. त्यामुळे गावात बसफेरी पोहोचताच ढोलताशाच्या गजरात बसचे स्वागत केले. खºया अर्थाने ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली. बस चालक आणि वाहकाचा ग्रामस्थांनी सत्कार केला.जुनेवानी हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने आतापर्यंत या गावात बसफेरी पोहोचलेली नव्हती. ‘गाव तिथे एसटी’ हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य त्यामुळे फोल ठरले होते. याबाबत नागरिकांनी बºयाचदा काटोल आगाराकडे निवेदन दिले. लोकप्रतिनिधींकडेही निवेदन सोपवित पाठपुरावा केला. परंतु त्याचा काहीएक फायदा होऊ शकला नाही.गावात बसफेरी नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेत तालुका मुख्यालय गाठावे लागत. दुसरीकडे गावातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. साधारणत: ५ किमी पायी जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत. एवढेच काय तर तालुका मुख्यालयी कोणत्याही कामकाजासाठी जायचे असल्यास ५ किमी पायी जावे लागे. ही बाब लक्षात घेत नागरिकांनी अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला साकडे घातले. अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेण्यात आली. त्यानुसार बुधवारी जुनेवानी गावात एसटी महामंडळाची बस पोहोचली. काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी हिरवी झेंडी दाखवून पहिल्या फेरीचे औपचारिक उद्घाटन केले.