पहिल्या टप्प्यातील मतदान पुन्हा व्हावे : आशिष देशमुख यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:56 IST2019-04-13T21:54:32+5:302019-04-13T21:56:17+5:30
पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान पुन्हा व्हावे : आशिष देशमुख यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.
आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे की, पूर्वी एका मतदान केंद्रात दोन ईव्हीएम लावण्यात येत होते. परंतु व्हीव्हीपॅट यंत्रणेमुळे एका केंद्रात एक ईव्हीएम लावण्यात आले. शहरी भागात एका बुथवर १४०० व ग्रामीण भागात जास्तीत जास्त १२०० मतदारास मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी देण्यात आली. परंतु व्हीव्हीपॅट लावल्यामुळे एक मत टाकण्यासाठी ४६ सेकंदाचा वेळ लागला. अशा प्रकारे ठरलेल्या वेळेत केवळ ८६० मत टाकता येऊ शकतात. १४०० मत टाकणे अशक्य आहे.
कमी मतदान होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. देशमुख यांनी सत्ताधारी पक्षाने आपल्या प्रभाव क्षेत्रातील एका मतदान केंद्रातील मतदारांची संख्या कमी केली तर इतर भागात एका बूथवर तुलनात्मकदृष्ट्या अधिक मतदार होते. त्यांनी सांगितले की, रामदासपेठ येथील एका बूथवर ८९६ तर बजेरिया येथे ७४५ मतदार होेते. तर सैफीनगर व मोमीनपुरा येथील बुथवर १३७३ आणि १२५७ मतदार होते. या भागात कमी मतदान व्हावे, यासाठीच हे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.