शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात शासकीय व मनपाच्या इमारती तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:06 IST

केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासन तत्परतने कामाला लागले आहे. या मार्गाच्या कामात अडथळा असलेली दुकाने, इमारती तोडण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात महापालिका आपल्या स्वत: च्या मालकीच्या व शासकीय इमारती तोडणार आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात करण्यात आली. बडकस चौक येथील पार्किंगची जागा व महापालिका सहकारी बँकेची संरक्षण भिंत तोडण्यात आली.

ठळक मुद्देनागपुरातील केळीबाग मार्गाचे रुंदीकरण : आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासन तत्परतने कामाला लागले आहे. या मार्गाच्या कामात अडथळा असलेली दुकाने, इमारती तोडण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात महापालिका आपल्या स्वत: च्या मालकीच्या व शासकीय इमारती तोडणार आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात करण्यात आली. बडकस चौक येथील पार्किंगची जागा व महापालिका सहकारी बँकेची संरक्षण भिंत तोडण्यात आली.मंगळवारी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर प्रवीण दटके, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाºयांनी १.७० कि.मी. लांबीच्या केळीबाग मार्गाची पाहणी केली. हा मार्गा २४ मीटर रुंद करण्याच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. १.७० कि.मी. लांबीच्या या मार्गावर १५७ दुकाने व इमारती बाधित होतात. या मार्गालगतच्या नझुलच्या जमिनीवर १७० दुकाने आहेत. तहसीलदारांना बाधितांची यादी सोपविण्यात आली आहे.महापालिका सर्वप्रथम आपल्या स्वत:च्या मालकीच्या जागेवरील बांधकाम तोडणार आहे. यात महापालिकेच्या गांधीबाग झोन कार्यालयाच्या इमारतीचा मोठा भाग तोडला जाणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुगदल यांनी ‘लोकमत’ला दिली. सहकारी बँक व पार्किंगच्या जागेवरील बांधकाम हटविण्यात आले. अतिक्रमण हटविण्याची व तोडण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे तसेच मार्गाच्या पुनर्निर्माण प्रस्तावाचे कामही सुरू राहणार आहे. सिमेंट रोडच्या तिसऱ्या टप्प्यात या मार्गाचे काम केले जाणार आहे. आयुक्तांनी बाधित होणाऱ्या दुकानदारांशी व स्थानिक नागरिकांसोबत पाहणी दौऱ्यादरम्यान चर्चा के ली.अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती आयुक्तांनी घेतली. अधिकाऱ्यांसोबतच प्रवीण दटके यांनीही बाधित होणाऱ्या इमारतींची माहिती दिली. मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम, एसएनडीएल, ओसीडब्ल्यू यांच्यासह अन्य विभागात समन्वय ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी गांधीबाग झोनच्या सभापती वंदना यंगटवार, नगरसेवक राजेश घोडपागे, सहायक आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थित होते.महाल बाजाराचे अस्तित्व संपणारबडकस चौक ते महाल टाऊ न हॉल दरम्यानच्या मार्गावरील बाजारामुळे या भागात कायम वर्दळ असते. परंतु केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणासोबतच बाजाराचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. रुंदीकरणात बाजारातील बहुसंख्य दुकाने तुटणार आहेत.बाधितांना मिळणार मोबदलाकेळीबाग मार्गाच्या रुंदीकरणात ज्या लोकांची दुकाने वा घरे जाणार आहेत, त्यांना मोबदला दिला जाणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. मोबदल्याचे स्वरूप अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. याबाबत अर्ज प्राप्त झाल्यानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे.आठवडाभरात दस्ताऐवज सादर करामहापालिके ने केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणामुळे बाधित होणारे दुकानदार, इमारत मालकांना आठवडाभरात जागा मालकी हक्काबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहे. बाधितांना महापालिकेतर्फे पत्र पाठविण्यात आलेली आहेत. महाल झोन कार्यालयात दस्ताऐवज स्वीकारले जाणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMahalमहाल