शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शक्ती कायद्याच्या विधीमंडळ समितीची पहिली बैठक आज नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कारवाई व्हावी या दृष्टीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कारवाई व्हावी या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत विधिमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार आहे. या समितीची पहिली बैठक उद्या सोमवारला नागपुरात विधान भवन येथे होणार असून निमंत्रित महिला व वकिल संघटनासोबत चर्चा होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे या बैठका होणार आहेत. यासाठी महिला संघटना व वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत. पहिली बैठक आज नागपूरमध्ये विधान भवन येथे होणार असून १९ जानेवारी मुंबई येथे तर २९ जानेवारीला औरंगाबाद येथे या बैठका होतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यासाठी संबधितांनी आपले मत हे लेखी स्वरुपात आणावे. संबंधित तारखेला तिन्ही ठिकाणी दुपारी ३ वाजता निमंत्रित महिला संघटना तसेच सायं. ५ वाजता वकील संघटना असे वेळ देण्यात आली आहे.

या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रति शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय चर्नी रोड मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या विधेयकाची प्रत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. संबंधितांनी आपल्या सूचना सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतीमध्ये विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रिक्लेमेशन मुंबई येथे किंवा a1.assem-bly.mls@gmail.com या ई-मेलवर १५ जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवाव्यात. असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.