फटाके उडवत, घोषणा देत आणि संयुक्तरित्या गाणी म्हणत लावले 'दिवे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 21:37 IST2020-04-05T21:36:47+5:302020-04-05T21:37:16+5:30

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व देश एकत्र आहे, या संदेशाचा संयुक्त कृतीसोहळा म्हणून ज्याकडे पाहिले जात होते, तो दिवे लावण्याचा कार्यक्रम नागपुरात नागरिकांनी कोरोना फेस्टिव्हलसारखा एन्जॉय केला.

Fireworks, announcing and jointly singing songs | फटाके उडवत, घोषणा देत आणि संयुक्तरित्या गाणी म्हणत लावले 'दिवे'

फटाके उडवत, घोषणा देत आणि संयुक्तरित्या गाणी म्हणत लावले 'दिवे'

ठळक मुद्देउपराजधानीतील नागरिकांचा उत्साह कोरोना फेस्टिव्हलचा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व देश एकत्र आहे, या संदेशाचा संयुक्त कृतीसोहळा म्हणून ज्याकडे पाहिले जात होते, तो दिवे लावण्याचा कार्यक्रम नागपुरात नागरिकांनी कोरोना फेस्टिव्हलसारखा एन्जॉय केला. कुणाच्या तरी गच्चीवर कुणाच्या तरी बाल्कनीत किमान १०-१५ जण एकत्र येऊन हातात दिवे पकडून घोषणा दिल्या व नंतर खाली उतरून फटाकेही उडवून झाले. कोरोनाचा पाश दिवसेंदिवस घट्ट होत जाण्याच्या काळात नागरिकांमधील संवेदनशीलता व गांभीर्य एकीकडे वाढते आहे असे वाटतानाच दुसरीकडे प्रत्येक कृतीचे उत्सवीकरण करण्याचा त्यांचा अट्टहास हा नागपुरातील अनेक सशिक्षित, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये दिसून आला. नुकत्याच हाताशी येत असलेल्या बातम्यांनुसार, शहरातील मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा, अभ्यंकरनगर, गोपालनगर, रामेश्वरी, गोधनी रोड अशा अनेक वस्त्यांमध्ये हा दिवे लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. जोडीला वंदेमातरम, भारत माता की जय यांच्या घोषणा होत्याच. तेवढ्यावरही नागरिकांचा उत्साह न शमल्याने त्यांनी रस्त्यावर येऊन फटाकेही उडवले.

Web Title: Fireworks, announcing and jointly singing songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.