शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

वनांसकट प्राण्यांच्याही जीवावर उठला ‘वणवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:37 IST

राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील एकूण ६१ हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्राचा विचार करता हे नुकसान ०.५ टक्के म्हणता येईल. वनविभागाच्या दृष्टीने हे अत्यल्प असले तरी वृक्ष लागवडीसाठी व वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे होणाऱ्या प्रयत्नांना यामुळे नक्कीच खीळ बसत आहे.

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वनक्षेत्रात एकीकडे सातत्याने घट होत असताना दुसरीकडे वारंवार वणवा लागण्याच्या घटनांमुळे जंगलाचे अतोनात नुकसान होत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात जंगलामध्ये वणवा लागण्याच्या १७,९७६ घटनांची नोंद करण्यात आली असून यामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटनांमुळे जंगलातील जैवविविधतेला धोका निर्माण होत असून अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागातर्फे सातत्याने होत असलेले प्रयत्नही निष्फळ ठरताना दिसत आहेत.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ २०१७ मध्ये राज्यातील जंगलात ५८४४ लहान मोठ्या आगी लागण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे २०१८ साली जानेवारीपासून आतापर्यंत जंगलक्षेत्र व इतर भागात लहानमोठ्या ३००० च्यावर आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. २०१३ पासून वणवा लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याची नोंद आहे. २०१३ मध्ये २९२८ घटना, २०१४ मध्ये २६८३ घटना, २०१५ मध्ये १८८० घटना व २०१६ मध्ये ४६४१ घटना घडल्या व यामध्ये ३५,८३८ हेक्टर जंगल प्रभावित झाले. पाच वर्षात १ लाख १६,६९२ हेक्टर जंगलाचे क्षेत्र वणव्यांमुळे जळून खाक झाले आहे. या घटनांमध्ये १३५ लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान मोजण्यात आले असले तरी वनांतील जैवविविधता अधिक प्रभावित झाली आहे.

वणव्याची अनेक कारणेजंगलात आग लागण्याच्या घटनांमागे अनेक प्रकारची कारणे आहेत. मात्र या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहेत, यावर अनेकांचे एकमत आहे. अनेक वेळा तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून जंगल परिसरात राहणारे व तेंदूपत्ता गोळा करणारे लोकच जंगलामध्ये आग लावतात. वनविभागाद्वारे अवैध कारभार करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने आणि जंगलामध्ये जाण्यास मनाई केल्यामुळे सूड घेण्यासाठीही वनांमध्ये आगी लावल्या जात असल्याची शक्यता वनविभागातर्फे व्यक्त केली जाते. नक्षलवादी सहसा वनांमध्ये आग लावत नसले तरी, कधी कधी मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून हे कृत्य केले जाते. दुसरीकडे मोहफूल स्पष्ट दिसावे, मध मिळविण्यासाठी मधमाशांचे पोळे जाळणे, चांगला चारा निर्माण व्हावा म्हणून, अशी लहान मोठी कारणे यामागे असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

आग लागण्याच्या घटनांमध्ये घट होत आहे. यापूर्वी घटना निदर्शनास येत नव्हत्या, मात्र सॅटेलाईट तंत्रज्ञानाने प्रत्येक घटना समोर येत असल्याने आकडे मोठे वाटतात. असे असले तरी वणव्यावर नियंत्रणासाठी विभागातर्फे सातत्याने उपाय केले जात आहेत. आग लागू नये म्हणून प्रिव्हेन्टीव्ह मेजर अवलंबिले आहेत. यामध्ये विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच छोट्या छोट्या परिसरात फायर लाईन तयार केली जाते. शिवाय प्रत्येक रेंजमध्ये फायर वॉचरची स्ट्राईक फोर्स तयार केली असून ती सातत्याने लक्ष देत असते. आग लागल्यानंतर नियंत्रणासाठी उपाय होत आहेत. ११ फायर फायटिंग युनिट्स तसेच १२७६ पोर्टेबल फायर ब्लोअर उपलब्ध केले आहेत. स्मार्ट फोन, वाहनांची उपलब्धता वाढविली आहे. आपत्ती निवारणासाठी आरक्षित पोलीस दलाच्या तीन बटालियन व आगीवर नियंत्रणासाठी दरवर्षी ३० कोटींचे प्रावधान केले आहे.- आर. एस. यादव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकवणवा लागल्यानंतर आगीपासून बचाव करण्यासाठी मोठे प्राणी बाहेर पळूनही जातात, मात्र जंगलातून बाहेर पडल्यावर वन्यजीव-मानव संघर्षही यामुळे निर्माण होतो. दुसरीकडे जंगलात वावरणारे लहानमोठे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांना प्राण गमवावे लागतात आणि विविध प्रकारचे वृक्ष व अनेक जैवविविधतेच्या घटकांचे मोठे नुकसान होत आहे. वनसंपदा बचावासाठी यावर नियंत्रण आवश्यक आहे.- कुंदन हाते, मानद वन्यजीव संरक्षक

टॅग्स :forest departmentवनविभाग