नागपुरातील दवा बाजाराला आग; कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 13:03 IST2019-05-31T09:51:51+5:302019-05-31T13:03:19+5:30
येथील गंजीपेठ भागात असलेल्या संदेश दवा बाजार या संकुलाला शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास आग लागली.

नागपुरातील दवा बाजाराला आग; कोट्यवधींचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: येथील गंजीपेठ भागात असलेल्या संदेश दवा बाजार या संकुलाला शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता भीषण रुप धारण केले. आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्याप प्रयत्नरत आहेत. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात जिवीतहानीचे अद्याप तरी कोणते वृत्त नाही.
शुक्रवारी तलावाजवळ ही चार मजली इमारत असून त्यातील तिसऱ्या व चौथ्या मजल्याला आग लागली. या इमारतीत औषधांची होलसेलची दुकाने आहेत तसेच काही गोदामेही आहेत. शॉटसर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत बहुतेक सर्व औषधे खाक झाली असून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ही आग आता विझवण्यात आली आहे.