हॉटेल ओरियंट ग्रॅण्डमध्ये आग
By मंगेश व्यवहारे | Updated: May 8, 2024 12:55 IST2024-05-08T12:53:38+5:302024-05-08T12:55:00+5:30
Nagpur : अशोक चौकातील हॉटेल ओरियंट ग्रॅण्डमध्ये आग

Fire in Hotel Orient Grand
नागपूर : अशोक चौकातील हॉटेल ओरियंट ग्रॅण्डमधील पहिल्या माळ्यावर असलेल्या कॉन्फरन्स हॉलला बुधवारी सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातील गाडी सकाळी ९ वाजता घटनास्थळी पोहचली. पथक पोहचले असता हॉटेलमध्ये धूर पसरला होता.
कॉन्फरन्स हॉलमधील एसी, खुर्ची, सोपा व वायरिंग जळून खाक झाली होती. पथकाने लगेच कार्यवाहीला सुरूवात केली आणि अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. मे महिन्यापासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या ८ दिवसात आगीची ही पाचवी घटना आहे.