बेलाेना येथील घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:19+5:302021-02-14T04:09:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बेलाेना : बेलाेना (ता. नरखेड) येथील घराला शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. ती नियंत्रणात ...

बेलाेना येथील घराला आग
लाेकमत न्यूज नेटवर्क
बेलाेना : बेलाेना (ता. नरखेड) येथील घराला शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. ती नियंत्रणात येईपर्यंत घर व आतील साहित्याची राख झाली. यात दाेन लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती आगपीडित व्यक्तीने दिली. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
गजानन ठाेंबरे व त्यांचे कुटुंबीय घरात झाेपले असताना शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास माेठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी गजानन ठाेंबरे व त्यांच्या कुटुंबीयांना जाेरजाेरात आवाज देत जागे केले. शिवाय, स्थानिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिवाय, नरखेड व माेवाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बाेलावण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास अथक प्रयत्न करीत आग नियंत्रणात आणली. शिवाय, ती इतरत्र पसरणार नाही, यासाठी याेग्य उपाययाेजनादेखील केल्या. आग नियंत्रणात येईपर्यंत घराचा बहुतांश भाग आणि आतील जीवनावश्यक साहित्य तसेच धान्य व शेतमाल जळाला. या आगीत दाेन लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले, अशी माहिती गजानन ठाेंबरे यांनी दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तलाठी व पाेलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शासनाने या आगपीडिताला आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.