अग्निशमन प्रशिक्षण केंद्राला सुरुवात
By Admin | Updated: November 9, 2016 03:10 IST2016-11-09T03:10:28+5:302016-11-09T03:10:28+5:30
राज्याच्या नगरविकास विभागाने नागपूर शहरात विभागीय अग्निशमन प्रशिक्षण कें द्र सुरू करण्याला मंजुरी दिली होती.

अग्निशमन प्रशिक्षण केंद्राला सुरुवात
महापौरांच्या हस्ते शुभारंभ : पहिल्या तुकडीत २७ प्रशिक्षणार्थी
नागपूर : राज्याच्या नगरविकास विभागाने नागपूर शहरात विभागीय अग्निशमन प्रशिक्षण कें द्र सुरू करण्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कळमना केंद्रातील या प्रशिक्षण केंद्र्राला सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटन प्रसंगी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख, झोन सभापती कांता लारोकर, नगरसेवक जगतराम सिन्हा, उपायुक्त रवींद्र देवतळे, अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके, स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे आदी उपस्थित होते.
नागपूरसह विदर्भातील इच्छुक उमेदवारांना अग्निशमन प्रशिक्षणासाठी मुंबई, पुणे व ठाणे शहरात जावे लागत लागत होते. परंतु आता नागपुरातच प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्याने या भागातील उमेदवारांची सुविधा झाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून उत्कृष्ट आग्निक निर्माण व्हावे. प्रशिक्षण केंद्राचा दर्जा राष्ट्रीय स्तरावरील असावा, असे मत प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केले. दयाशंकर तिवारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कळमना येथील अग्निशमन केंद्राच्या इमारतीत यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रात २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सहा महिन्यांनी ही संख्या ५० पर्र्यत वाढविण्यात येईल. येथे प्रशिक्षणार्थींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५२,६०० रुपये खर्च येणार आहे.प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी कळमना केंद्रावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्राचार्य, प्रशिक्षक व सहायक अशा १० जणांची गरज भासणार आहे. भविष्यात अग्निशमन विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तोपर्यंत अग्निशमन विभागाच्या कळमना व इतर केंद्रातील अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिल्या तुकडीत प्रामुख्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयांंतर्गत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवड केली जाते. यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व १८ वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना खासगी व औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन विभागात भरती करताना प्राधान्य दिले जाते. अशी माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.(प्रतिनिधी)