शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

३६ तासापासून धुमसतेय नागपुरातील कोल्ड स्टोअरेजची आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:34 PM

भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरुची मसालेच्या पाच मजली क ोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सलग ३६ तासापासून आग धुमसत असल्याने कोल्ड स्टोअरेजी इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच आग बाजूच्या गोदामात पोहोचली आहे. यामुळे धोका वाढला आहे.

ठळक मुद्देपाच मजली इमारत झाली धोकादायकआजूबाजूचा परिसर सील केलापरिसर तापल्याने आग आटोक्यात येणे अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरुची मसालेच्या पाच मजली क ोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सलग ३६ तासापासून आग धुमसत असल्याने कोल्ड स्टोअरेजी इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच आग बाजूच्या गोदामात पोहोचली आहे. यामुळे धोका वाढला आहे.कोल्ड स्टोअरेजमध्ये मिरचीचा हजारो टन साठा असून, आगीमुळे परिसरात मिरचीचा धूर पसरला आहे. यामुळे बचाव कामात अग्निशमन विभागाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी आग आटोक्यात आणताना अग्निशमन विभागाचे चार जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार गाड्यांच्या मदतीने सोमवारी दुपारी २ पासून अग्निशमन विभागाचे अधिकारी व जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी उप मुख्य अधिकारी बी.पी.चंदनखेडे, मोहन गुडधे, सुनील डोकरे, मोहन बरडे, आपदा प्रबंधन कक्षाचे सहायक केंद्र अधिकारी केशव क ोठे, सहायक केंद्र अधिकारी सुनील राऊ त, मुन्ना वाघमारे यांच्यासह विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनीही घटनास्थळाची पाहणी करून सूचना केल्या.आगीमुळे धुराचे प्रचंड लोळ उठत असल्याने लांब अंतरावरून पाण्याचा मारा करावा लागत आहे. आता ही इमारतच धोकादायक झाली असल्याने इमारतीजवळ जाऊन आग आटोक्यात आणणे धोकादायक असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या ठिकाणी हायड्रंट यंत्रणा सुरू असल्याने आग नियंत्रणासाठी लागणारे पाणी उपलब्ध आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी यामुळे मदत झाली. परंतु आगीमुळे लांबवरून पाण्याचा मारा करावा लागत आहे. आता ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने जवळून पाण्याचा मारा करणे धोकादायक असल्याचे उचके यांनी सांगितले.इमारत असुरक्षित घोषित केली होतीकोल्डस्टोअरेच्या ठिकाणी आग नियंत्रण यंत्रणा नाही. बांधकामाचे निकष पूर्ण केले नसल्याने अग्निशमन विभागाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यासंदर्भात विभागाने कोल्डस्टोअरेजच्या मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.इमारत असुरक्षित घोषित करण्यात आली होती. इमारतीवर कारवाई केली जाणार होती. परंतु न्यायालयातन यावर स्थगनादेश आणला होता.चार कर्मचारी जखमीकोल्डस्टोअरेजची आग आटोक्यात आणताता अग्निशमन विभागातील कळमना केंद्रातील चालक डी.व्ही. विणेकर, फायरमन आर.डी. पवार, योगेश खोडके, रोशन कावळे असे चौघे जखमी झालेत. त्यांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.२०१३ मध्ये आगीत सहा मजली इमारत कोसळलीसुरुची मसालेच्या सहा मजली कोल्डस्टोअर इमारतीला २०१३ मध्ये आग लागली होती. यात मिरचीचा साठा ठेवण्यात आला होता. आग आटोक्यात आली नव्हती त्यामुळे ही इमारत आगीमुळे जमीनदोस्त झाली होती. त्यानंतरही कोल्डस्टोअरेजच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. पाचव्या मजल्यावर स्प्रींकलरची व्यवस्था असती तर आग वेळीच आटोक्यात आली असती.

 

टॅग्स :fireआगnagpurनागपूर