शहरं
Join us  
Trending Stories
1
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
2
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
3
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
4
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
5
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
6
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
7
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
8
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
9
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
10
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
11
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
12
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
13
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
14
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
15
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
16
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
17
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
18
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
19
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

By कमलेश वानखेडे | Updated: December 15, 2023 17:31 IST

फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नागपूर: ‘आगीच्या घटना रोखण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) इमारतींचे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सोबतच फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आ. विद्या ठाकूर यांनी  लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, जय भवानी एस.आर.ए गृहनिर्माण संस्था गोरेगाव या सोसायटीला ऑक्टोबर २०२३ मध्ये आग लागली. सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक रहिवासी जखमी झाले. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मात्र प्रत्यक्षात पूर्ण मदत अद्याप मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले. यावर मंत्री सावे म्हणाले, आगीची घटना घडल्यानंतर तातडीने बैठक घेतली. या इमारतीला फायर ऑडिट करून अग्निशमन उपकरणे अनिवार्य करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

 आ. रवींद्र वायकर यांनी मुंबई शहरात एसआरएची स्थिती वाईट असून पुनर्वसन म्हणून बांधलेल्या इमारतीत पुरेशा सुविधा नसल्याचे सांगितले. विकासकाला अतिरिक्त एफएसआय देतो. फायर ऑडिट करणार तर केव्हा करणार हे सांगण्यात यावे. यापूर्वीही असेच आश्वासन दिले, मात्र फायर ऑडिट झालेच नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बिल्डरांच्या घशात जात आहे, यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली.

अवैध रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करणार- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘रूफ टॉफ हॉटेलमध्ये आगी लागतात. तक्रार आल्यानंतर पुण्यातील रूफ टॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला.तोडपाणी करून पुन्हा हे हॉटेल सुरू करण्यात आले, असा दावा त्यांनी केला. अग्निशमनची परवानगी नाही तरीही असे हॉटेल सुरू आहेत. अवैध रूफ टॉप हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर ‘रूफ टॉप हॉटेलचा मुद्दा नगर विकास विभागाला पाठविण्यात येईल. अवैध हॉटेलवर बंदी आणू’, असे आश्वासन अतुल सावे यांनी दिले.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर