लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, मध्यरात्रीची घटना
By मंगेश व्यवहारे | Updated: June 21, 2023 12:00 IST2023-06-21T12:00:05+5:302023-06-21T12:00:53+5:30
१० फायर टेंडर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, मध्यरात्रीची घटना
मंगेश व्यवहारे, नागपूर: नागपूरच्या लकडगंज परिसरातील आरा मशीन (लाकडाच्या कारखान्याला) मध्यरात्री आग लागली. या आगीत पाच कारखान्यातील मोठ्या प्रमाणात लाकूड जळाल्याची माहिती आहे. 3 वाजताच्या सुमारास घटनेची सूचना अग्नीशमन विभागाला मिळाली. 10 फायर टेंडर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले, आग कशामुळे लागली याचा पंचनामा अग्नीशमन विभाग करीत आहे.