चंडिकानगरातील विद्युत डीपीला आग, नागपूर जिल्ह्यातील घटना
By मंगेश व्यवहारे | Updated: July 3, 2023 15:42 IST2023-07-03T15:42:24+5:302023-07-03T15:42:54+5:30
सुरूवातीला डीपीतून स्पार्किंग होण्यास सुरूवात झाली होती

चंडिकानगरातील विद्युत डीपीला आग, नागपूर जिल्ह्यातील घटना
मंगेश व्यवहारे, नागपूर: मानेवाडा-बेसा रोडवरील चंडिकानगर नंबर २ मध्ये असलेल्या विद्युत डीपीला सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागली. सुरूवातीला डीपीतून स्पार्किंग होत असल्याने स्थानिक लोकांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधला. परंतु महावितरणचे कर्मचारी वेळेवर न पोहचल्याने स्पार्किंग वाढत गेली आणि आगीने चांगलाच भडका घेतला. त्यामुळे अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आली.
नरेंद्रनगर व सक्करदरा येथून दोन फायर टेंडर घटनास्थळी रवाना झाले. आगीच्या भडका चांगलाच असल्याने वाहतूक थांबविण्यात आली होती. अग्निशमन पथकाने घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे परिसरात काही काळ विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे लोकांनी सांगितले.