लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी आमदार चरण वाघमारे व इतर पाच जणांविरुद्धचा एक एफआयआर व खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
इतर आरोपींमध्ये वाघमारे यांचे स्वीय सहायक विजय भुरे, तुमसर पंचायत समिती अध्यक्ष नंदू ऊर्फ चंद्रशेखर रहांगडाले, पत्रकार अमित रंगारी, निवृत्त पशू संवर्धन अधिकारी डॉ. शांताराम चाफले व शेतकरी प्रशांत लांजेवार यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भंडारा जिल्ह्यातील मांडेसार येथे मतदारांना मिठाई, बिस्कीट इत्यादी खाद्यपदार्थाची कीट वाटप केली जात आहे, अशी माहिती मोहाडी पोलिसांना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ च्या सुमारास मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर वाघमारे यांनी ७० ते ८० कार्यकर्त्यासोबत पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला, असा आरोप होता. या प्रकरणात मोहाडी पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी वाघमारे व इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
Web Summary : Bombay High Court quashed FIR against ex-MLA Charan Waghmare and five others, deemed illegal. Accused of creating chaos at Mohadi police station during 2014 election.
Web Summary : बंबई उच्च न्यायालय ने पूर्व विधायक चरण वाघमारे और पांच अन्य के खिलाफ एफआईआर रद्द की, जिसे अवैध माना गया। 2014 के चुनाव के दौरान मोहाडी पुलिस स्टेशन में हंगामा करने का आरोप।