शंभरावं नाट्य संमेलन येथेच उरकून टाकू ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:22 IST2019-02-24T00:20:29+5:302019-02-24T00:22:14+5:30
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शीघ्र कवी म्हणून परिचित आहेत. ते जिथे जातात तिथे काव्य उधळण आपसूकच होत असते. अ.भा. मराठी नाट्य संमेलन सध्या नागपुरात सुरु आहे. शनिवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठवले यांनी भेट दिली, तेव्हा त्यांच्यातील कवी जागा झाला. त्यांनी मनसोक्तपणे काव्य उधळले. त्यांच्या काव्याला रसिक प्रेक्षकांनीही मनमुराद दाद दिली.

शंभरावं नाट्य संमेलन येथेच उरकून टाकू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शीघ्र कवी म्हणून परिचित आहेत. ते जिथे जातात तिथे काव्य उधळण आपसूकच होत असते. अ.भा. मराठी नाट्य संमेलन सध्या नागपुरात सुरु आहे. शनिवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठवले यांनी भेट दिली, तेव्हा त्यांच्यातील कवी जागा झाला. त्यांनी मनसोक्तपणे काव्य उधळले. त्यांच्या काव्याला रसिक प्रेक्षकांनीही मनमुराद दाद दिली.
आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच काव्याच्या ओळीने केली. ते म्हणाले
‘‘विदर्भाची भूमी नाही कशासाठी कमी
देवेंद्र फडणवीस आणि मी तुम्हाला देतो हमी
आणि तुम्हाला काहीच पडणार नाही कमी’’
आज मला झाला आहे फारच आनंद
कारण संमेलनाचे अध्यक्ष आहेत गज्वी प्रेमानंद
मी राहिलो नाही अंध म्हणून
सोडले होते पाच वर्षापूर्वीच ते बंध...
संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांना उद्देशून आठवले म्हणाले
यांच्या नाटकचे नाव होते छावणी
म्हणून झाली आहे खेळकरांची लावणी...
लोक ठोकतात आरोळ्या
म्हणून मला सुचतात चारोळ्या...
आपणही एकदा नाटकात काम केल्याची आठवण त्यांनी सांगितली. एकच प्याला या नाटकात आपण भूमिका केल्याचे सांगताच रसिकप्रेक्षक खळखळून हसले. त्यावर कवितेत आठवले म्हणाले..
ज्यावेळी मी घेतला होता एकच प्याला
समोरचा मला एकदम भ्याला तो असा गारद झाला
म्हणून मी सोडला एकच प्याला...
नरेंद्र मोदी मला म्हणतात हॅलो कविराज
मी त्यांना म्हणतो मी आलो तुमच्याजवळ आज..
शंभराव नाट्य संमेलन येथेच उरकून टाकू
नरेंद्र मोदी यांची झोळी मतानं भरून टाकू ..
असे म्हणत त्यांनी प्रचारही उरकून टाकला.