चार हजार रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:47+5:302021-04-17T04:08:47+5:30
बाजारगाव : काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पायमल्ली करणाऱ्यावर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पाेलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या ...

चार हजार रुपयांचा दंड वसूल
बाजारगाव : काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पायमल्ली करणाऱ्यावर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पाेलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या माेहिमेच्या पहिल्या दिवशी (शुक्रवार, दि. १६) २० जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करावे यासाठी काेंढाळी पाेलिसांनी शुक्रवारी बाजारगाव येथे रूट मार्च केला. यावेळी पाेलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना मास्क वापरणे, घराबाहेर न पडणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी न करणे, विनाकारण घराबाहेर न पडणे यासह अन्य उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन केले. शिवाय याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पाेलीस अधिकाऱ्यांनी दिला. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी या पथकाने मास्क न वापरणाऱ्या २० नागरिक व दुकानदारांवर प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे चार हजार रुपयांचा दंड ठाेठावला व ताे लगेच वसूल केला. रूट मार्च ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला हाेता. दंडात्मक कारवाई माेहीम सहायक पाेलीस निरीक्षक साेनवले, सरपंच तुषार चौधरी, ग्रामसेवक हिंगवे, ग्रामसदस्य बालकदास चौरे, बीट जमादार बन्सोड यांच्या पथकाने राबविली. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच तुषार चाैधरी यांनी दिली.