शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

वेस्टमध्ये व्हॅल्यू शोधा ; केंद्रीय मंत्री गडकरींचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:52 AM

मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला कचरा याचे मूल्यवर्धन करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे नवीन संशोधकांना, स्टार्टअपनी शेती, कचरा, जंगल, बांबू यावर संशोधन करून, त्याची व्हॅल्यू वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूजल व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देस्टार्टअपचा ग्रॅण्ड फिनाले समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला कचरा याचे मूल्यवर्धन करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे नवीन संशोधकांना, स्टार्टअपनी शेती, कचरा, जंगल, बांबू यावर संशोधन करून, त्याची व्हॅल्यू वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूजल व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि कौशल्यविकास मंत्रालयाच्या वतीने राज्यात स्टार्टअप यात्रा काढण्यात आली होती. याचा ग्रॅण्ड फिनाले विश्वश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ऊर्जा व पालकमंत्री चंद्रश्ेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव असिम गुप्ता, व्हीएनआयटीचे चेअरमन विश्राम जामदार व व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे उपस्थित होते. ३ आॅक्टोबर रोजी मुंबई येथून स्टार्टअप यात्रेला सुरुवात झाली. राज्यातील १४ जिल्ह्यात स्टार्टअपच्या कार्यशाळा झाल्या. यातून ३१० स्टार्टअप निवडण्यात आले. ग्रॅण्ड फिनालेमध्ये यातून १९ स्टार्टअपला पुरस्कृत करण्यात आले. ग्रॅण्ड फिनालेतून निवडण्यात आलेल्या १९ स्टार्टअपना नितीन गडकरी यांच्याहस्ते पुरस्कृत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रसंगी विश्राम जामदार म्हणाले की, व्हीएनआयटीमध्ये इंटरप्रेन्युअरचा स्वतंत्र विभाग आहे. व्हीएनआयटीमध्ये प्लेसमेंट सुद्धा चांगल्या होतात. पण चांगल्या इन्स्टिट्यूटचा मापदंड हा जास्त प्लेसमेंट पेक्षा उद्योजक किती घडविले असा असला पाहिजे. यावेळी असिम गुप्ता म्हणाले की, तरुणांमध्ये भन्नाट आयडिया आहेत. पण त्या प्र्रोडक्टमध्ये कर्न्व्हट करता आल्या पाहिजे. तेव्हाच मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होईल. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. अभिनंदन पाटील ठरला स्टार्टअप हिरो आॅफ द स्टेटस्टार्टअप ग्रॅण्ड फिनालेमध्ये उत्कृष्ट आयडिया मांडणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात स्टार्टअप हिरो आॅफ द स्टेटचा पुरस्कार कोल्हापूरच्या अभिनंदन पाटील यांनी पटकाविला. तर टॉप वूमन इंटरप्रेन्युअरचा पुरस्कार प्रियंका सरवदे, पूजा भलमीकर व मयुरी सावंत यांनी पटकाविला. त्याचबरोबर विविध गटामध्ये अर्जुन देवरणकर, मुकेश बिसेन, सुरेंद्र काळबांडे, दीपक सावंत, प्रियंका पाटील, हंसराज पारधी, डॉ. वैशाली कुळकर्णी, निकेश इंगळे, वैभव माधेकर, स्वागता कावळे, मधुरा राठी, योगेश भंडारी, आशिष चांदवलकर, अमित माहोरे, मिथिलेश हिंगे यांना पुरस्कृत करण्यात आले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर