अखेर पारशिवनीतील चाैकात गतिराेधकाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:05+5:302021-01-13T04:19:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी (दि.६) सायंकाळी झालेल्या अपघातात दाेन दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा मृत्यू ...

अखेर पारशिवनीतील चाैकात गतिराेधकाचे काम सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी (दि.६) सायंकाळी झालेल्या अपघातात दाेन दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे शहरात गुरुवारी तीव्र पडसाद उमटले. संतप्त नागरिकांनी रास्ता राेकाे आंदाेलन करीत चाैकात उपाययाेजना करण्याची मागणी रेटून धरली हाेती. दरम्यान नागरिकांच्या आंदाेलनाची दखल घेत प्रशासनाने चाैकात गतिराेधक बसविण्याचे काम सुरू केले आहे.
आमडी फाटा ते सावनेर महामार्गावर असलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात वाहनाची सतत वर्दळ असते. बेलगाम वाहतुकीमुळे याठिकाणी अनेकदा अपघात घडले. या चाैकात गतिराेधक बसविण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. बुधवारी (दि.६) भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दाेन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला हाेता. या घटनेमुळे नागरिकांनी रास्ता राेकाे करीत चाैकात उपाययाेजना करण्याची मागणी केली. आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नातून उपाययाेजनाबाबत ताेडगा निघाल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, शनिवारी (दि.९) प्रशासनातर्फे चाैक परिसरात गतिराेधक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. नागरिकांच्या भावनांची दखल घेत या चाैकात गतिराेधकासाेबत हायमास्ट लाईट त्वरित सुरू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी अपूर्ण असलेले महामार्गावरील काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. आशिष जयस्वाल यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता नीलेश बोरकर, पाेलीस निरीक्षक संतोष वैरागडे, वीज कंपनीचे मनोज मानमोडे, वीरेंद्र गजभिये, विजय भुते, सचिन सोमकुवर, रुपेश खंडारे, राहुल नाखले, दीपक शिवरकर, टिकाराम परतेकी, राहुल ढगे, रोशन पिंपळामुळे, सलिम बाघाडे, संजय कुंभलकर, प्रेम भोंडेकर, गौरव पनवेलकर,अर्षद शेख आदींसह नागरिक उपस्थित हाेते.