शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार

By कमलेश वानखेडे | Updated: January 18, 2025 17:32 IST

Nagpur : महसूल मंत्र्यांनी दखल घेताच प्रलंबित ८७ अर्ज मंजूर

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारधी समाजातील विद्यार्थ्यांना अनेक खेटे घालूनही जात प्रमाणपत्र दिले जात नाही. दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थिनींवर शिक्षण अर्धवट सोडून लग्न करण्याची वेळ आली. शेवटी या प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. जात प्रमाणपत्रासाठी प्रलंबित असलेले ८७ अर्ज मंजूर करण्यात आले असून लवकरच संबंधितांना जात प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. जात प्रमाणपत्रासाठी महसूल प्रशासनाकडून प्रत्येकासाठी १९५० पूर्वीचा पुरावा बंधनकारक आहे.

मात्र, पारधी समाजातील यापूर्वीच्या पिढ्या जंगल खोऱ्यात भटकं जीवन जगत असल्यामुळे अनेक पारधी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या आधीच्या पिढीचे (पूर्वीजांचे) जातीचे दाखले व इतर पुरावे नाहीत. त्यामुळे अनेक होतकरू पारधी विद्यार्थ्यांना आदिवासी म्हणून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करून दोन- दोन वर्ष उलटले, तरी त्यांना नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने जात प्रमाणपत्र दिलेले नाही. अर्ज केल्यानंतर दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र दिले जात नव्हते, यासाठी जबाबदार अधिकारी कोण, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

महसूल अधिकाऱ्यांचा अडथळा

  • पारधी समाजाची १९५० पूर्वीच्या पुराव्याची अडचण राज्य सरकारने आधीच लक्षात घेतली आहे.
  • महसूल अधिकाऱ्यांना पारधी बेड्यांवर जाऊन गृहभेटी आणि मोक्काचौकशी करून १९५० पूर्वीचे पुरावे नसलेल्या पारधी जातीतील अर्जदारांना जात प्रमाणपत्र द्यावे असे नियम तयार केले आहेत.
  • मात्र महसूल प्रशासनाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेकडो पारधी विद्यार्थी जात प्रमाणपत्र विना असल्याची दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे.

 

तर अधिकाऱ्यांवर कारवाई

"पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात तातडीने विभागीय आयुक्तांकडे बैठक घेऊ. पारधी समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यामध्ये अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली असेल, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू."- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

टॅग्स :nagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेCaste certificateजात प्रमाणपत्र