शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अखेर नागपुरातील अपहृत युवकाची हत्या , तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:11 IST

फिरायला नेण्याच्या बहाण्याने वस्तीतील युवकाचे अपहरण करून अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांनी त्याची हत्या केली. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोअर्सजवळ राहत होता तर आरोपी परतेकी बंधूही रामनगर तेलंगखेडी परिसरातच राहतात.

ठळक मुद्देगुंडांमधील वर्चस्वाचा वाद : कुख्यात परतेकी बंधू गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फिरायला नेण्याच्या बहाण्याने वस्तीतील युवकाचे अपहरण करून अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांनी त्याची हत्या केली. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोअर्सजवळ राहत होता तर आरोपी परतेकी बंधूही रामनगर तेलंगखेडी परिसरातच राहतात.आरोपी संतोष आणिं त्याचा भाऊ प्रशांत या दोघांसोबत दोन दिवसांपूर्वी वाडीतील कुख्यात गुंड जेम्सचे कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण सुरू असतानाच जेम्सने त्याचा मित्र कुणालला फोन करून फुटाळा तलावावर बोलवले. त्यानंतर आरोपी संतोष आणिप्रशांतसोबतचा वाद तीव्र झाला. जेम्स आणि कुणालने संतोष आणि प्रशांतला तर, या दोघांनी जेम्स आणि कुणालला जीवे मारण्याची धमकी दिली. कसाबसा वाद निवळल्यानंतर हे सर्व एकमेकांना धमक्या देतच आपापल्या घरी गेले. या पार्श्वभूमीवर, संतोष आणि प्रशांतने कुणाल आणि जेम्सचा गेम करण्याचा कट रचला.मंगळवारी सकाळी १० वाजता कुणालला त्याचा मित्र आकाश पाल याने फिरायला जाऊ, असे सांगून सोबत नेले. मागावर असलेले संतोष आणि प्रशांतही कुणालला रस्त्यात भेटले. जुने भांडण विसरून जा, आपण सोबत राहू असे म्हणत आरोपींनी कुणाल तसेच आकाशला आधी सीताबर्डी, नंतर भिवसनखोरी गिट्टीखदान आणि त्यानंतर वाडी परिसरात गेले. या तीनही ठिकाणी आरोपी आणि कुणाल यथेच्छ दारू पिले. दारूच्या नशेत टुन्न झालेले हे तिघे नंतर दवलामेटी, सोनबानगर पहाडावर गेले. आकाश पाल त्याच्या घरी परतला. रात्रीपर्यंत कुणाल घरी आला नाही. त्यामुळे कुणालचा भाऊ विशाल शालिकराम चचाणे (वय २०) याने आकाशला विचारणा केली असता त्याने कुणालला संतोष आणि प्रशांतने सोबत नेल्याचे सांगितले. विशालने रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली. मात्र, कुणाल किंवा आरोपी परतेकी बंधूपैकी कुणाचाच पत्ता लागला नाही. त्यामुळे रात्री अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली.पीएसआय एन.डी. शेख यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे आणि त्यांचे सहकारी बेपत्ता कुणालसह आरोपींचा शोध घेत असतानाच आरोपी संतोष आणि प्रशांत पोलिसांच्या हाती लागले. त्यांना कुणालबद्दल विचारले असता आरोपींनी त्याची सोनबागनगर पहाडावर हत्या केल्याचे सांगितले. आरोपींना पोलिसांनी पहाडावर नेले, तेथे रक्ताच्या थारोळ्यात कुणालचा मृतदेह पडून होता. तो रुग्णालयात पाठवून पोलिसांनी आरोपींना अटक केली.परिसरात प्रचंड तणावकुख्यात परतेकी बंधूंनी कुणालची हत्या केल्याची वार्ता परिसरात कळताच प्रचंड तणाव निर्माण झाला. विशेष म्हणजे, मृत कुणालने यापूर्वी प्रणय कावरेची हत्या केली होती. अल्पवयीन असल्यामुळे त्याची सुधारगृहातून लवकर सुटका झाली. त्यानंतर तो गुंडगिरी करू लागला. त्याचा मित्र जेम्स हासुद्धा वाडीतील कुख्यात गुंड आहे. त्याने खुशाल कुहिकेची हत्या केली आहे. संतोष परतेकी याने वाडीत दोघांची हत्या केली होती. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ प्रशांत हादेखील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने वर्धा येथे एकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. लुटमार, हाणामारी यासह अन्य गंभीर गुन्ह्यांतही तो आरोपी आहे. संतोष आणि प्रशांत अंबाझरी, वाडी, गिट्टीखदान, काटोल भागात दादागिरी करतात. त्यांची त्या भागात प्रचंड दहशत आहे.कुणालसह जेम्सचाही होणार होता गेमकुणाल आणि जेम्स हे नव्याने गुन्हेगारीत आले असले तरी, ते बेदरकारपणे कुणाच्याही अंगावर धावून जातात. त्यामुळे ते आपला गेम करू शकतात, अशी आरोपींना भीती होती. त्यामुळे त्यांनी आकाश आणि जेम्सचा गेम करण्याचा कट रचला होता. ठिकठिकाणी दिवसभर कुणालला दारू पाजून टुन्न केल्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन आरोपींनी त्याला जेम्सला फोन करायचा आग्रह धरला. त्याला बोलव आपण सेटलमेंट करू, असे ते वारंवार कुणालला म्हणत होते. मात्र, कुणालने त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे आरोपींनी त्यालाच दगडाने ठेचून संपवले. दरम्यान, या हत्याकांडामुळे वाडी,अंबाझरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सायंकाळी अंबाझरी ठाण्यात जाऊन आरोपींची चौकशी केली. ठाणेदार भीमराव खंदाळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून