अखेर माहिती आयोगाला मिळाले तीन आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST2021-09-18T04:09:13+5:302021-09-18T04:09:13+5:30

नागपूर : राज्य माहिती आयुक्तपदावर तीन आयुक्तांची अखेर नेमणूक करण्यात आली. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय आणि पत्रकार राहुल ...

Finally, the Information Commission got three commissioners | अखेर माहिती आयोगाला मिळाले तीन आयुक्त

अखेर माहिती आयोगाला मिळाले तीन आयुक्त

नागपूर : राज्य माहिती आयुक्तपदावर तीन आयुक्तांची अखेर नेमणूक करण्यात आली. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय आणि पत्रकार राहुल भालचंद्र पांडे या तिघांची या पदावर नियुक्ती झाली आहे. या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून, राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली. माहिती आयोगाकडे अनेक महिन्यांपासून आयुक्तांची पदे रिक्त होती. राज्यातील आठपैकी चार खंडपीठांचा कारभार प्रभारीभरोसे सुरू होता. त्यामुळे माहिती आयोगाकडे ७४ हजारांहून अधिक तक्रारी व द्वितीय अपिले प्रलंबित होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या नेमणुकीला हिरवी झेंडी दिली. तीन नवीन राज्य माहिती आयुक्त मिळाल्याने आयोगाच्या कामाची गती वाढेल व प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Finally, the Information Commission got three commissioners