अखेर पुलाचे भगदाड बुजविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:08 IST2021-08-01T04:08:49+5:302021-08-01T04:08:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलावर पुरामुळे भगदाड पडले हाेते. ते अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता ...

अखेर पुलाचे भगदाड बुजविले
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलावर पुरामुळे भगदाड पडले हाेते. ते अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता बळावल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच बुजविले आहे.
या मार्गावरील पुलाखालून पुराचे पाणी व्यवस्थित वाहून जात नसल्याने ते पुलावरून वाहते. त्यात या पुलाला पुरामुळे भगदाड पडल्याने यासंदर्भात लाेकमतमध्ये बुधवारी (दि. २८) ‘मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलावर भगदाड’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले हाेते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी (दि. ३०) हे भगदाड सिमेंट काॅंक्रीटने बुजविले आहे.
या पुलाखालून पुराचे पाणी व्यवस्थित वाहून जात नाही. त्यामुळे पुलावरून पाणी वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प हाेते. शिवाय, राेडही खराब हाेता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने भगदाड बुजविण्यासाेबतच पुलाच्या खालच्या भागाची साफसफाई केली. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.