अखेर नागपुरातील २१ रुग्णालयांची कोविडसाठी सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:01 IST2020-09-21T20:00:10+5:302020-09-21T20:01:18+5:30

कोविड रुग्णालयाच्या कार्यान्वयासंबंधी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीद्वारे ६३ रुग्णालयांची सुनावणी सुरू आहे. गेल्या शनिवारी सुनावणीला अनुपस्थित हॉस्पिटल्सना नोटीस पाठवून पुन्हा एकदा सुनावणीची संधी देण्यात आली होती. अखेर २१ रुग्णालयांचे डॉक्टर, प्रतिनिधींनी सोमवारी उपस्थित राहून बहुतांश रुग्णालयांनी कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यास सहमती दर्शविली व याबाबतचे पत्र हॉस्पिटलद्वारे सादर करण्यात आले.

Finally, 21 hospitals in Nagpur agreed for Covid | अखेर नागपुरातील २१ रुग्णालयांची कोविडसाठी सहमती

अखेर नागपुरातील २१ रुग्णालयांची कोविडसाठी सहमती

ठळक मुद्देउच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णालयाच्या कार्यान्वयासंबंधी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीद्वारे ६३ रुग्णालयांची सुनावणी सुरू आहे. गेल्या शनिवारी सुनावणीला अनुपस्थित हॉस्पिटल्सना नोटीस पाठवून पुन्हा एकदा सुनावणीची संधी देण्यात आली होती. अखेर २१ रुग्णालयांचे डॉक्टर, प्रतिनिधींनी सोमवारी उपस्थित राहून बहुतांश रुग्णालयांनी कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यास सहमती दर्शविली व याबाबतचे पत्र हॉस्पिटलद्वारे सादर करण्यात आले.
कोविड रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३९ रुग्णालये पूर्णत: कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहेत. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे.
सुनावणी प्रसंगी समितीचे अध्यक्ष महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अनिल लद्धड व समितीचे सचिव, मनपा प्रभारी उपायुक्त मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.
कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यासंदर्भात खासगी रुग्णालयांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी समितीसमोर शनिवारी ६३ रुग्णालयांच्या प्रशासन आणि डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. मात्र यापैकी ३५ रुग्णालयांचेच प्रतिनिधी उपस्थित असल्याने रुग्णालयांच्या अनुपस्थितीवर समितीने नाराजी वर्तविली होती.
सोमवारी सर्व रुग्णालयांनी उपस्थिती नोंदविली व समितीपुढे आपल्या अडचणी मांडल्या. यापैकी बहुतांश रुग्णालयांनी यासाठी सहमती दर्शविली.

लेखी स्वरूपात हमी
खासगी रुग्णालयात उपलब्ध बेड्सच्या संख्येनुसार त्यापैकी व्हेटिंलेटर, आयसीयू आणि आॅक्सिजनची सुविधा या सर्वांची सविस्तर माहिती समितीपुढे सादर करून यामधून ठराविक बेड्स कोविडसाठी उपलब्ध करून देण्याची हमी लेखी स्वरूपात समितीपुढे देण्यात आली आहे. रुग्णालयांनी सामंजस्याची भूमिका घेऊन शहरासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले. सर्व रुग्णालयांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाकडे समितीचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Finally, 21 hospitals in Nagpur agreed for Covid