चिंचभुवन आरओबीची अंतिम लोड चाचणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:48+5:302021-02-06T04:11:48+5:30
नागपूर : वर्धा रोडवर चिंचभुवन आरओबीच्या रेल्वे ट्रॅकवर गर्डरच्या भागात गुरुवारी सकाळ ते रात्रीपर्यंत लोड चाचणी घेण्यात आली. या ...

चिंचभुवन आरओबीची अंतिम लोड चाचणी पूर्ण
नागपूर : वर्धा रोडवर चिंचभुवन आरओबीच्या रेल्वे ट्रॅकवर गर्डरच्या भागात गुरुवारी सकाळ ते रात्रीपर्यंत लोड चाचणी घेण्यात आली. या ठिकाणी मालाने लादलेले चार ट्रक एकाच वेळी उभे करण्यात आले. याशिवाय एका जेसीबी मशीनने कामही सुरू ठेवण्यात आले. पुलाखाली स्टील गर्डरवर अनेक उपकरणे लावून गणनेचा क्रम निरंतर सुरू होता. गुरुवारी आरओबीची अंतिम चाचणी झाली. यावरून हे स्पष्ट होते की, आता आरओबी वाहतुकीसाठी सज्ज असून केवळ उद्घाटनाची औपचारिकता राहिली आहे. या पुलामुळे वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही, हे विशेष.
गुरुवारी सकाळी कंत्राटदार कंपनीच्या अभियंत्यांची चमू प्रत्येक वेळेच्या तापमानावर ४७ मीटर लांबीच्या स्टील गर्डरखाली उभे राहून आकड्यांची नोंद करीत होती. या गणनेत कोणत्याही त्रुटीचा पैलू पुढे आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पुलाच्या गर्डर असलेल्या भागात मास्टिकचा थर चढविण्यात आला आहे. दोन स्पॅनची (हिस्सा) लोड टेस्ट पूर्वीच झाली आहे. आता एक वर्षापेक्षा जास्त उशिराने तयार झालेल्या या पुलाच्या उपयोगाच्या प्रतीक्षेत लोक आहेत. वर्धा रोडवरून ये-जा करण्यासाठी सुरक्षित बनविण्यासाठी पूल तयार करण्यात आला आहे. अशा सकारात्मक स्थितीत लोकांना पुलाच्या उपयोगासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न अनुत्तरित आहे.