लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून ओसीडब्ल्यू व महापालिकेने २७ फेब्रुवारीला २४ तासांचे शटडाउन घेतला आहे. पेंच १ जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी आवश्यक कामे शटडाउनदरम्यान करण्यात येणार आहे. या शटडाउनमुळे १३ जलकुंभांवरून पाणी खंडित असेल.
या जलकुंभांचा पाणीपुरवठा खंडित
- सीताबर्डी कमांड एरिया - सीताबर्डी मेन रोड, टेकडी रोड, कुंभार टोली, नेताजी मार्केट, तेलीपुरा, आनंदनगर, मोदी क्रमांक १,२,३, गणेश मंदिर, रामदासपेठ, महाराजबाग रोड.
- वंजारीनगर जुना कमांड एरिया : वंजारीनगर, कुकडे लेआऊट, नवीन बाभुळखेडा, जुना बाभुळखेडा, चंद्रमणीनगर, ईश्वरनगर, प्रगतीनगर, श्यामनगर, कुंजीलाल पेठ, एम्प्रेस मिल कॉलनी, न्यू कैलासनगर, कैलासनगर, श्रमजीवीनगर, वसंतनगर.
- वंजारीनगर न्यू कमांड एरिया : विश्वकर्मानगर, रमाईनगर, वेळेकरनगर, बजरंगनगर, बोधिवृक्षनगर, रघुजीनगर, म्हाडा क्वॉर्टर, सोमवारीपेठ, राजे रघुजीनगर, ताजनगर, शिवराजनगर, सावित्रीबाई फुलेनगर, पोलिस क्वॉर्टर, अजनी.
- रेशीमबाग कमांड एरिया : जुनी शुक्रवारी, महावीरनगर, भगत कॉलनी, गणेशनगर, गायत्रीनगर, शिवपार्क, ओमनगर, सुदामपुरी, आनंदनगर, जुने नंदनवन, राजीव गांधी पार्क, नेहरूनगर, शिवनगर, लभानतांडा.
- हनुमाननगर कमांड एरिया : वकीलपेठ, सराईपेठ, सिरसपेठ, चंदननगर, महेश कॉलनी, हजारेवाडी, पीटीएस क्वॉर्टर, सोमवारीपेठ, प्रोफेसर कॉलनी, हनुमाननगर, रेशीमबाग, नागमोळी लेआऊट, मट्टीपुरा.
- गोदरेज आनंदम कमांड एरिया : दक्षिणामूर्ती चौक, पाताळेश्वर रोड, बिंझाणी महिला महाविद्यालय, कोतवाली पोलीस चौक, पंचांग गल्ली, छोटा राम मंदिर, जुने हिस्लाप कॉलेज, अत्तर ओळी, रामाजीची वाडी, कर्नलबाग, तेलीपुरा, गाडीखाना, जुनी शुक्रवारी, जोहरीपुरा.
- मेडिकल फीडर कमांड एरिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर, एसईसीआर रेल्वे, टाटा कॅपिटल, रामबाग कॉलनी, राजाबाक्षा, इंदिरानगर, जाटतरोडी क्रमांक ३, अजनी रेल्वे, रामबाग म्हाडा, शुक्ला आटाचक्की, उंटखाना, ग्रेट नाग रोड, बोरकरनगर, बारा सिंगल.
- सेंट्रल रेल्वे लाइन : बोरियापुरा कमांड एरिया : मोमिनपुरा,सैफीनगर, बकरा मंडी, अमन उल्ला मस्जिद, भानखेडा, आनंदनगर, जागनाथ बुधवारी, दंडारे मोहल्ला, मिरची बाजार, इतवारी रेल्वे बाजार चौक.
- लष्करीबाग कमांड एरिया : काश्मिरी गल्ली, नवा नकाशा, किदवाई मैदान, कुरडकरपेठ, भोसलेवाडी, समता मैदान, आंबेडकर कॉलनी, आरामशीन एरिया.
- गोरेवाडा जीएसआर कमांड एरिया : नेताजी सोसायटी, माधवनगर, दर्शना सोसायटी, सुदर्शननगर, गंगानगर, एकतानगर, नटराज सोसायटी, गणपतीनगर, उज्चनगर, महाराणानगर १ व २, श्रीहरीनगर, जयदुर्गानगर, आशानगर, गीतानगर, फरस रोड, साईबाबानगर, बंधूनगर, पुरुषोत्तम सुपर बाजार परिसर, मालवार ले-आउट, राधाकृष्णनगर, आदर्शनगर, बाबा फरीदनगर, गायत्रीनगर, प्रशांतनगर, राधाकृष्णनगर, इंगोलेनगर, सदभावनानगर, ग्रीनफील्ड सोसायटी.
- सदर कमांड एरिया : टायगर ग्राउंड, गोंडपुरा, ईदगाह, शीतलामाता मंदिर, रेसिडेन्सी स्कूल, गवळीपुरा, धोबीपुरा, किराडपुरा, गांधी चौक, खेमका गल्ली, उपवन लॉन, खाटीकपुरा, गोवा कॉलनी, मंगळवारी कॉम्पलेक्स, लिंक रोड, परदेसीपुरा, गड्डीगोदाम, गौतमनगर, खलाशी लाईन, लिबर्टी चौक.