'त्या'च नावाने भरा उमेदवारी अर्ज; विवाहित महिलांसाठी आयोगाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:28 IST2025-12-21T09:28:42+5:302025-12-21T09:28:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत २०२५ साठी विवाहित महिला उमेदवारांनी विवाहापूर्वीचे किंवा विवाहानंतरच्या नावांपैकी कोणते ...

Fill the nomination form in the same name; Commission's instructions to married women | 'त्या'च नावाने भरा उमेदवारी अर्ज; विवाहित महिलांसाठी आयोगाचे निर्देश

'त्या'च नावाने भरा उमेदवारी अर्ज; विवाहित महिलांसाठी आयोगाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत २०२५ साठी विवाहित महिला उमेदवारांनी विवाहापूर्वीचे किंवा विवाहानंतरच्या नावांपैकी कोणते नाव उमेदवारी अर्जावर नमूद करावे, याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना विवाहित महिला उमेदवारांना मतदार यादीमध्ये असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे.

यासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवाहित महिला उमेदवारास मतदार यादीमध्ये व नामनिर्देशनपत्रामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीज मतपत्रिकेवर इतर नावाचा उल्लेख करावयाचा असल्यास उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी तसा विनंती अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल.
ज्या नावाचा उल्लेख मतपत्रिकेवर करावयाचा आहे. त्याच्या पुष्ठर्थ आवश्यक पुरावे (विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध केलेले विवाहानंतरचे नाव) सादर करणे अनिवार्य आहे. असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

नाव बदलायचे असेल तर...
१ विवाहित महिला उमेदवारांकडे वरील प्रमाणपत्र तसेच राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदाराने मतदान करण्यापूर्वी आपली ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे ८ नोव्हेंबर २०११ रोजीच्या आदेशात नमूद केलेल्या १७पुराव्यांपैकी छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक राहील.
२ विवाहित महिलांना विवाहापूर्वी व विवाहानंतरचे दोन्ही नावे मतपत्रिकेवर जोडून छापण्याची विनंती केल्यास अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करताना मतदार यादीतील नावापुढे विवाहानंतरचे किंवा पूर्वीचे नाव देखील कंसात छापण्याची परवानगी दिली जाईल. ईव्हीएममध्ये नाव मुद्रित करण्यासाठी असलेल्या जागेचाच व विहित फाँटचा वापर होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Web Title : विवाहित महिलाएँ: चुनाव नामांकन के लिए मतदाता सूची नाम का उपयोग करें, आयोग का कहना है

Web Summary : विवाहित महिलाओं को नामांकन फॉर्म पर अपनी मतदाता सूची का नाम उपयोग करना होगा। यदि मतपत्र पर कोई भिन्न नाम चाहिए, तो अंतिम तिथि से पहले प्रमाण के साथ अनुरोध सबमिट करें। नाम परिवर्तन दस्तावेज उपलब्ध नहीं होने पर वैकल्पिक आईडी स्वीकार्य है। उम्मीदवार सूची में दोनों नाम दिखाई दे सकते हैं।

Web Title : Married Women: Use Voter List Name for Election Nomination, Says Commission

Web Summary : Married women must use their voter list name on nomination forms. If a different name is desired on the ballot, submit a request with proof before the deadline. Alternative ID is acceptable if name change documents are unavailable. Both names can appear in candidate lists.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.