नागपुरातील डागा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनसाठी पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:52 AM2018-07-13T00:52:26+5:302018-07-13T00:54:49+5:30

डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नव्या पदांची निर्मिती करून त्या भरण्याच्या सूचना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिल्या. गुरुवारी राज्य लोकलेखा समितीकडून डागा रुग्णालयाची ‘तपासणी’ करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या. रुग्णालयातील सोईसुविधा व व्यवस्था पाहून समितीने समाधान व्यक्त केल्याची माहिती आहे.

Fill Posts for upgradation Daga Hospital | नागपुरातील डागा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनसाठी पदे भरा

नागपुरातील डागा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनसाठी पदे भरा

Next
ठळक मुद्देआ. अग्रवाल यांनी केल्या सूचना : लोकलेखा समितीकडून डागा रुग्णालयाची ‘तपासणी’


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नव्या पदांची निर्मिती करून त्या भरण्याच्या सूचना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिल्या. गुरुवारी राज्य लोकलेखा समितीकडून डागा रुग्णालयाची ‘तपासणी’ करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या. रुग्णालयातील सोईसुविधा व व्यवस्था पाहून समितीने समाधान व्यक्त केल्याची माहिती आहे.
मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या पाहणीनंतर डागा रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीने गुरुवार १२ जुलै रोजी डागा रुग्णालयाला भेट दिली. केंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य उपयोग केला जात आहे किंवा नाही, याची चाचपणीही या भेटीत करण्यात आली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांच्यासह सात आमदार होते. सुरुवातीला समितीने रुग्णालयाची व वॉर्डांची पाहणी केली. रुग्णालयातील स्वच्छता, सोईसुविधा व प्रशासकीय कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. रुग्णालयातील विशेष नवजात शिशू कक्षाची (एनसीसीयू) पाहणी केली, तसेच रुग्णालयात भरती रुग्णांचीही आस्थेने विचारपूस केली. डागा रुग्णालयाचे ५०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्याला मंजुरी मिळाली, परंतु नवी पदे मंजूर करण्यात आली नसल्याने हे श्रेणीवर्धन रखडल्याने आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना तातडीने ही पदे भरण्याचा सूचना केल्या. या भेटीत आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पातूरकर, डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर आदी उपस्थित होते.
‘कम्पोनंट सेप्रेटर’ घेण्याच्या दिल्या सूचना
डागा रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी आवश्यक असलेले ‘कम्पोनंट सेप्रेटर’ सारखे आवश्यक उपकरण उपलब्ध नसल्याने रुग्णांना होल ब्लड (संपूर्ण रक्त) दिले जाते. रुग्णांना गरज असलेली प्लाज्मा, प्लेटलेट मिळत नाही. या संदर्भातील वृत्त गुरुवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. याची दखल घेत ‘कम्पोनंट सेप्रेटर’ घेण्याच्या सूचनाही आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Fill Posts for upgradation Daga Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.