दाेन गटात हाणामारी, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:14 IST2020-12-05T04:14:08+5:302020-12-05T04:14:08+5:30

नगरधन : दाेन गटात झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन येथे शुक्रवारी (दि. ...

Fighting in Daen group, three injured | दाेन गटात हाणामारी, तिघे जखमी

दाेन गटात हाणामारी, तिघे जखमी

नगरधन : दाेन गटात झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन येथे शुक्रवारी (दि. ४) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

जखमींमध्ये भूषण सराेदे (२७), राम धाेपटे (२५) व राजू धाेपटे (४५) तिघेही रा. नगरधन, ता. रामटेक यांचा समावेश आहे. १० ते १५ जणांनी भूषणला नगरधन येथील दुर्गा चाैकात गाठून त्याच्यावर चाकू, तलवार व राॅडने हल्ला चढविला. त्याला वाचविण्यासाठी काही स्थानिक तरुण सरसावले. त्यांनी त्यांच्यावरही हल्ला केल्याने यात भूषणसाेबत राम व राजू जखमी झाले. त्यानंतर सर्व जण तिथून पळून गेले. भूषण व राजूला नागपूर येथील रुग्णालयात तर रामला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे. हल्लेखाेर टामन गँगचे सदस्य असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Fighting in Daen group, three injured