बार संचालकांत हाणामारी, विनयंभगाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:07 IST2021-07-09T04:07:30+5:302021-07-09T04:07:30+5:30

कपिलनगरात बार चालविणारा संचालक दुसऱ्या बार मालकाचे फोटो, शूटिंग करून ते जिल्हा प्रशासनाकडे पाठवितो आणि वारंवार तक्रार करण्यासाठी दडपण ...

Fighting among bar directors, complaint of humiliation | बार संचालकांत हाणामारी, विनयंभगाची तक्रार

बार संचालकांत हाणामारी, विनयंभगाची तक्रार

कपिलनगरात बार चालविणारा संचालक दुसऱ्या बार मालकाचे फोटो, शूटिंग करून ते जिल्हा प्रशासनाकडे पाठवितो आणि वारंवार तक्रार करण्यासाठी दडपण आणतो, अशी ओरड आहे. त्यामुळे त्याच्याही बारमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्यासाठी विरोधी बार संचालकाने आपला पंटर ‘त्या’ बार संचालकाकडे पाठविला. तो मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करीत असल्याचे लक्षात आल्याने बारसंचालकाचा मुलगा आणि कर्मचारी पंटरकडे धावले. त्यांनी त्याची बेदम धुलाई केली. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून दुसरा बारसंचालकही धावला. त्यामुळे दोन बारसंचालकांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर कपिलनगर पोलीस ठाण्यात एका बार संचालकाने तक्रार केली. आपला मुलगा आणि सुनेसोबत मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप त्या बारसंचालकाने लावला. त्यावरून पोलिसांनी गुरपाल ऊर्फ मोंटू सरदार आणि पारस नामक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Fighting among bar directors, complaint of humiliation