शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’ला तीव्र विरोध : नागपूरनजीकच्या वानाडोंगरीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:39 IST

हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.

ठळक मुद्देसर्वपक्षीय एकवटले, बसेस अडविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.‘ईव्हीएम’चा विरोध करीत बॅलेट पेपरनेच निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी नगर परिषद आणि तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी ७ वाजतापासून सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी सर्व व्यापारी प्रतिष्ठानच्या मालकांना आवाहन करीत प्रतिष्ठाने बंद केले.बंददरम्यान जिल्हा परिषदेची शाळा वगळता इतर सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी राजीवनगरात दाखल होऊन नागपूर महापालिकेची ‘आपली बस’सह स्कूल बस अडविल्या. एवढेच काय तर वायसीसीई कॅम्पससमोर एका स्कूलबसवर दगड भिरकावला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचले. त्यामुळे अनर्थ टळला. बर्डी ते हिंगणा जाणाऱ्या बसेस वानाडोंगरीपर्यंत येऊन परत गेल्या. यामुळे प्रवाशांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मात्र सुरू होत्या. बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नगर परिषदेकडे येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालय कुलूपबंद करून ते घराकडे गेले. त्यामुळे तेथेही अनुचित प्रकार होण्यापासून टळले. सर्वपक्षीयांनी पुकारलेला हा बंद कडकडीत पाळण्यात येऊन व्यापाऱ्यांनीही त्यांच्या हाकेला साद घातली.तेव्हा ‘ईव्हीएम’ सेट नव्हती काय?वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन उतरलो. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदार राजा हा हुशार आहे. तो कसल्याही भूलथापांना बळी पडला नाही. विरोधकांना मात्र आता पराभव पचनी पडत नाही म्हणून त्यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणे सुरू केले आहे. ‘ईव्हीएम’ सेट करून निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्यांनी पारशिवनी येथील निवडणूक डोळ्यासमोर ठेवावी. तेथेही आम्ही ईव्हीएम सेट केले होते काय. एवढेच काय तर रायपूर ग्रामपंचायत आणि हिंगणा नगर पंचायतमध्येही गत काळात निवडणूक होऊन भाजपचा पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम सेट नव्हते काय, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत केले.‘ईव्हीएम’वर पराभवाचे खापर फोडणे कितपत योग्य : समीर मेघेवानाडोंगरी नगर परिषदेत भाजपचा झालेला विजय हा जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. मात्र विरोधक आता पराभवाचे खापर हे ‘ईव्हीएम’वर फोडत आहे. त्यांनी पराभव स्वीकार करावा. लोकांना भडकवून आंदोलनाचा मार्ग पत्करणे ही कृती दिशाभूल करणारी आहे. विरोधकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. मात्र त्यांनी बंददरम्यान स्कूल बसवर दगडफेक केली. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर दोन दिवसांत गुन्हे दाखल करावे. अन्यथा भाजपही रविवारपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल, असे हिंगण्याचे आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.वानाडोंगरी परिसरात मागील तीन वर्षांत १६ कोटींची विकास कामे झाली. लवकरच आणखी विकास कामांचा धडाका लागणार आहे. या परिसरातील प्रस्तावित ‘कोल बेल्ट’ रद्द व्हावा, यासाठी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला. असे असताना केवळ तहसीलदारांना निवेदन दिले म्हणून कोळसा खाण रद्द झाली, असा प्रचार करीत आहे. या भूलथापांना येथील जनता बळी पडली नाही. या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांविरोधात लढले. या विरोधकांना त्यांचे सर्वमिळून २१ उमेदवार निवडणुकीत उभे करता आले नाही. पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरता येत नाही, ते येथील विकास काय करणार, असा प्रश्न उपस्थित करीत मेघे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :nagpurनागपूर