अमरावतीतील लाकूडबाजारात भीषण आग
By Admin | Updated: May 21, 2017 13:49 IST2017-05-21T13:49:28+5:302017-05-21T13:49:28+5:30
अचलपूर रोडवर असलेल्या लाकूडबाजाराला रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास भीषण लागून तीत लाखो रुपयांचे नुकसन झाल्याची घटना घडली.

अमरावतीतील लाकूडबाजारात भीषण आग
आॅनलाईन लोकमत
अमरावती: येथील अचलपूर रोडवर असलेल्या लाकूडबाजाराला रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास भीषण लागून तीत लाखो रुपयांचे नुकसन झाल्याची घटना घडली. यात सिलेंडरचा स्फोट होऊन पाच फर्निचरच्या दुकानांसह तीन ट्रक व एक कार जळून खाक झाली. नागरिक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणता आली. अमरावतीचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, दुय्यम ठाणेदार फरकाडे व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.